चौफेर न्यूज – दिवाळीनिमित्त प्रचिती इंटरनॅशनल स्कूल तर्फे गरजूंसाठी दिवाळी फराळ व कपड्यांचे वाटप व कार्यक्रमाचे आयोजन -दिवाळीनिमित्त प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी इयत्ता नववी ची भूमिका बोरसे विद्यार्थिनी हिने वसुबारस या दिवशी गायीची पाडवा सह पूजा केली जाते. हिंदू लोक गाईला पवित्र मानतात. गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव असतात तिची उपयुक्तता पूजा केली जाते. ज्याच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. पंचगव्य म्हणजे गाईपासून मिळणाऱ्या पाच वस्तू त्यात गायीचे दूध, दही,तूप,शेण गोमूत्र पंचगव्याने आंघोळ करणे व पोटात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते .गाईचे शेण व गोमूत्र अलक्ष्मी नाश करण्याचे सर्वोत्तम साधन आहे. फक्त एक दिवस जरी गोमूत्र,शेण, दुध, दही, तूप यांचे प्राशन केले तरी पातकांचा नाश होतो. या दिवशी पाडवांसह पूजा अशी माहिती विशद केली. अश्विन वद्य त्रयोदशी या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात. या दिवशी संध्याकाळी धनाची व व आयुर्वेदिक औषधांची पूजा केली जाते. धन्वंतरी आरोग्याची देवता असून या देवतेचे स्मरण करून पूजा करावी. त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभते परिज्ञा भामरे या विद्यार्थिनीने दिली. नरक चतुर्दशीला सर्व लोक पहाटे उठून सुवासिक तेल उटणे लावून गरम पाण्याने स्नान करतात. घरात सगळीकडे दिवे लावतात. घर प्रकाशाने उजळून टाकतात. अशी माहिती अनुष्का चिंचोले या विद्यार्थिनीने दिली. अश्विन मध्य अमावस्येला घरोघरी लक्ष्मीपूजन करतात. श्री लक्ष्मीचे स्वागत होते. या दिवशी बलीच्या बंदीवासातून लक्ष्मीची सुटका झाली. त्यामुळे सर्वांना आनंद झाला तिचे वास्तव्य आपल्या घरात कायमचे रहावे. त्यासाठी सर्वजण तिची मोठ्या भक्ती भावाने पूजा करतात. अशी माहिती कृष्णा अकलाडे या विद्यार्थिनीने सांगितले. व्यापारी याच दिवशी जमाखर्चाच्या वह्यांची पूजा करतात. भाऊ बहिणीच्या प्रेमाचा दिवस म्हणजे भाऊबीज बहिण भावाला ओवाळते व भाऊ बहिणीला अलंकार किंवा पैसे देतो अशी माहिती प्रेक्षा पवार या विद्यार्थिनीने दिली. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनींनी सबके लिये हॅपी दिवाली या गाण्यावर नृत्य प्रदर्शन केले. शाळेच्या प्राचार्या सौ भारती पंजाबी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षकांना व कर्मचारी वर्गांना मग दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. प्रचिती इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक श्री प्रशांत भीमराव पाटील सर यांच्यातर्फे आदिवासी बांधवांना व गरजूंना दिवाळी फराळाचे व कपड्यांचे वाटप शाळेच्या प्राचार्या सौ. भारती पंजाबी मॅडम, प्राचार्या सौ. वैशाली लाडे मॅम, तसेच व्यवस्थापक श्री. वैभव सोनवणे सर ,श्री.तुषार देवरे सर,शिक्षक व वाहन चालक वर्ग व विद्यार्थ्यांमार्फत साक्री येथील करण्यात आले. दिवाळीनिमित्त इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची आकाश कंदील व दिवे सजावट करणे याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी सुंदर रांगोळी व फलक लेखन करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीचा विद्यार्थी तुषार कासार याने केले. सौ. स्मिता नेरकर मॅम, श्वेता सोनवणे मॅम, हेमांगी बोरसे मॅम यांनी संयोजन केले. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.