चौफेर न्यूज-आज दि. 4/10/2022 रोजी प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे दसरा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
मन से रावण जैसी बुराई का नाश हो और प्रभु श्रीराम का मन में वास हो ।
आजच्या या कार्यक्रमास शाळेचे समन्वयक श्री. राहुल अहिरे सर, मुख्याध्यापिका अनिता मॅम उपस्थित होत्या.
कार्यक्रमासाठी सुंदर असे फलक लेखन करण्यात आले. सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनुष्का मॅम यांनी केले. दसरा विषयी माहिती अर्चना देसले मॅम यांनी दिली.
भगवान श्रीराम ने उसी दिन रावण का दहन किया था । तथा माँ दुर्गा ने नौ रात्री के युद्ध के बाद दसवे दिन महिषासुर पर विजय प्राप्त की थी । इसे असत्य पर सत्य की विजय के रुप में मनाया जाता है ।
याचप्रमाणे शाळेचे समन्वयक श्री. राहुल अहिरे सर यांच्या हस्ते वहीपूजन व सरस्वतीपूजन व लेखनीपूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्याचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका अनिता मॅम यांनी वहीपूजन व सरस्वतीपूजन केले. नविन शाळेतही दरवाजावर रांगोळी काढून व फुल हार घालून पूजा करण्यात आली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी गरबा खेळून आनंद घेतला. सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या पारंपारिक पद्धतीने सुंदर अशी वेशभुषा परिधान करुन आले होते. दसऱ्याच्या सणानिमित्त राम, लक्ष्मण, हनुमान,सिता भूमिका विद्यार्थ्यांनी साकारली.
श्री. राहुल अहिरे सर यांच्या हस्ते रावणाच्या पुतळ्याचे दहण करण्यात आले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
अशा प्रकारे दसरा हा कार्यक्रम आनंदाने साजरा करण्यात आला.