चौफेर न्यूज – डिसेंबरमध्ये इयत्ता दहावी (CBSE 10th Board Exam 2023) आणि बारावी बोर्ड परीक्षांचं वेळापत्रक (CBSE Board Exam Date Sheet 2023) जाहीर करणार आहे. तसेच, सत्र 2022-23 च्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या (CBSE 12th Board Exam 2023) परीक्षा कोरोनापूर्वीच्या (Coronavirus) अभ्यासक्रमावर आधारित असतील. कोविडमुळे CBSE ने गेल्या वर्षी अभ्यासक्रमात 30 टक्के कपात केली होती.
सीबीएसई बोर्ड परीक्षांची वेळापत्रक डिसेंबर 2022 मध्ये प्रसिद्ध होईल. ते अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर प्रसिद्ध केलं जाईल. सत्र 2022-23 साठी परीक्षेचा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2019-20 प्रमाणेच असेल. यामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही.
यंदा cbse परीक्षा एकाच वेळी
गेल्या वर्षी सीबीएसईनं परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या होत्या. पहिल्या टर्मच्या परीक्षेचं आयोजन गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये करण्यात आलं होतं. तर टर्म-2 ची परीक्षा 26 एप्रिलपासून सुरू झाली होती. यंदा CBSE ने 15 फेब्रुवारी 2023 पासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे, यंदा परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे.