चौफेर न्यूज –Artificial Intelligence – एआय ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे. एआय म्हणजे मानवी बुद्धिमत्तेसारखे शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये आणि त्या मशीनमधल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनेक क्षेत्रात वापर केला जातो.
जॉन मॅककार्थी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शोध लावला होता. तसेच कालांतराने ह्या तंत्रज्ञानाला खूप मागणी वाढू लागली. भविष्यात याच तंत्रज्ञानाचा बोलबाला असणार आहे. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान मानवी जीवनाचा एक हिस्सा बनणार आहे. छोट्यात छोट्या कामात या एआय तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. मशीन लर्निंग हा सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भाग आहे. ज्यामध्ये एआयवर आधारित मशीन जुना डेटा एकत्रित करुन त्यांच्या मदतीने संपूर्ण माहिती जाणून घेते आणि त्यामध्ये गरजेनुसार बदल करते.
जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च सेंटर उपलब्ध आहेत. तिथे यावर नवनवीन प्रयोग होत असतात. त्यामुळे उच्चशिक्षण पद्धती हळूहळू पारंपारिक शिक्षणाच्या कोषातून बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे कोणतेही कठीण काम एका बुद्धिमान मशीन मार्फत केले जाऊ शकते.
अनेक ऑनलाईन कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मार्फत ग्राहकांना अनेक चांगल्या सेवा देऊ शकतात. त्यासोबत डेटा चोरी होणे, ऑनलाईन लिक्स, ऑनलाईन फ्रॉड्स इत्यादी गोष्टींवर नियत्रंण आणता येऊ शकते. डिजिटल गोष्टीमध्ये एआयचा खूप फायदा होऊ शकतो. जसे की स्मार्टफोन्स, ऑनलाईन बँकिंग व्यवहार, ऑनलाईन डेटा, फाईल्स सुरक्षित राहू शकतात. कोणीही यांना हॅक किंवा अॅक्सेस करु शकणार नाही. त्यामुळे गोपनीयता धोरण पाळले जाईल.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकण्यासाठी कोणते गुण असणं आवश्यक –
आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स करण्यासाठी संगणक आणि गणित विषय अनिवार्य आहेत. कॉम्प्युटर सायन्सचे पदवीधर उमेदवारही या क्षेत्रात काम करु शकतात. इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाद्वारे सॉफ्टवेअर अॅनालिटिक्स, रोबोटिक्स, प्रोग्रामर, गेमिंग क्षेत्रात नोकऱ्या मिळू शकतात.
हे कोर्सेस करणं महत्त्वाचं –
कॉम्प्युटर सायन्स, आयटी, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रोग्राम, पीजी प्रोग्राम इन मशीन लर्निंग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये करिअर करण्यासाठी मुख्य कोर्स आहेत.
गुगल, फेसबुक आणि लिंक्डइनसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. येथे रोजगाराच्या अनेक संधी आहेत. स्मार्टफोनच्या धर्तीवर प्रत्येक उपकरण चालवण्यासाठी आता या फील्डची गरज आहे.