चौफेर न्यूज – युवकांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी शासन विविध योजना राबवत असते. केंद्र सरकार मार्फतही अशी योजना चालवते, ज्यामध्ये 10 लाखांपासून ते 1 कोटींपर्यंत कर्ज मिळू शकते. देशातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी ही स्टँड अप इंडिया – योजना – सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत देशभरात आपला व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या युवकांना आणि महिला उद्योजकांना 1 कोटीपर्यंतचे कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतात. जाणून घेउया या कर्ज योजनेबद्दल. . .
तुमच्या गरजेनुसार तुम्ही या योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकता. तुम्हाला 10 लाख ते 1 कोटी पर्यंत निधी मिळू शकतो. कर्ज परतफेडीचा कालावधी सात वर्षांचा आहे.
अर्ज करण्याची पद्धत – या योजनेसाठी, केवळ एक महिला किंवा अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील व्यक्ती अर्ज करू शकते आणि कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे फर्ममध्ये 51% भागीदारी आणि नियंत्रण असावे. कंपनीची उलाढाल 25 कोटींपेक्षा जास्त नसावी व त्याच्याकडे कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेकडे कोणतीही थकबाकी नसावी. कंपनी खाजगी मर्यादित किंवा भागीदारी फर्म असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे – पासपोर्ट आकाराचा फोटो * आयडी प्रूफ – पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्सची छायाप्रत. * रहिवासी प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्रही यासाठी चालणार आहे. * भागीदारी फर्म असल्यास, भागीदारी कराराची कागदपत्रे. * भाडे करार * मागील तीन वर्षांचा ताळेबंद निव्वळ मालमत्ता आणि दायित्व तपशील.
या योजनेसाठी तीन प्रकारे अर्ज करू शकता – * बँकेच्या शाखेला भेट देऊन * (प्रमुख जिल्हा व्यवस्थापक लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजरकडे * SIDBI (भारतीय लघु उद्योग विकास बँक) च्या पोर्टलला भेट देऊन. https://www.standupmitra.in/ या पोर्टलद्वारे अर्ज करु शकता.