नाशिकला मिळाले सर्वसाधारण विजेतेपद
धुळे (चौफेर न्यूज) :- शासकीय व अनुदानित आश्रम शाळा विद्यार्थी यांच्या राज्यस्तरिय आश्रमिय क्रीडा स्पर्धा नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकेडमी मैदानात 10 ते 12 फेब्रुवारी 2023 दरम्यान नुकत्याच पार पडल्या. या राज्यस्तरिय आश्रमिय क्रीडा स्पर्धेचे उद्घघाटन आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांच्या हस्ते झाले.
राज्यस्तरीय आश्रमिय क्रीडा स्पर्धेत नाशिक विभागाला सर्व साधारण विजेते पदक मिळाले. यात नाशिक विभागाचे नेतृत्व करतांना धुळे जिल्ह्यातील आश्रम शाळेचे खेळ प्रकार निहाय 108 खेळाडू सहभागी झाले होते. यात 40 मुले व 57 मुली एकूण धुळे प्रकल्पाचे 97 खेळाडू यांनी नाशिक विभागाचे नेतृत्व अपर आयुक्त संदीप गोलाईत, नाशिक व प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (भाप्रसे) धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाले होते. यात धुळे प्रकल्पातील 97 पैकी 85 खेळाडू विद्यार्थी यांनी राज्यस्तरावर प्रावीण्य प्राप्त केले. तसेच विभागीय आश्रमिय क्रीडा स्पर्धेमध्ये धुळे प्रकल्पाला सर्व साधारण उपविजेता चषक प्राप्त झाला होता.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे ला प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय आश्रमिय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथमच धुळे प्रकल्पाचे सहभागी 97 खेळाडू पैकी 85 खेळाडूंना राज्यस्तरांवर विशेष प्रावीण्य प्राप्त झाले. यात धुळे प्रकल्पातील सांघिक खेळ प्रकारात व्हॉलीबॉल 17 वर्ष मुली व 14 वर्ष मुली विजेता चषक आमळी व वरसुस आश्रम शाळा, हॅन्डबॉल 14 वर्ष मुले व मुली विजेता चषक वारसा व जैताने आश्रम शाळा, रिले 4 बाय 100 मुले 14 वर्ष वाघाडी व रोहिणी आश्रमशाळा विजेता चषक तर रिले मुली 17 वर्ष 4 बाय 100 चषक तृतीय इदवे आश्रम शाळा असे सांघिकमध्ये राज्यस्तरावर विजेता 6 चषक प्राप्त झाले. तर वैयक्तिक खेळ प्रकारात धुळे प्रकल्पाला प्रथमच राज्य स्तरांवर 6 सुवर्ण, 5 रजत व 4 कांस्य असे एकूण 15 पदके प्राप्त केले.
धुळे प्रकल्पाचे खेळ प्रकार निहाय राज्यस्तरांवर प्राविण्य प्राप्त खेळाडू खालील प्रमाणे :-
योगेश गामिश पावरा (14 वर्ष मुले 400 मीटर धावणे वाघाडी प्रथम सुवर्ण), देवकी राजा राऊत (17 वर्ष मुली गोळा फेक वालवे प्रथम सुवर्ण), गीता शांताराम राऊत (17 वर्ष मुली, राईनपाडा लांब उडी सुवर्ण प्रथम), जगन शोभा पावरा (14 वर्ष मुले रेवाडी थाळी फेक सुवर्ण प्रथम), ममता रमेश वसावे (17 वर्ष मुली वरसुस थाळी फेक सुवर्ण प्रथम), रेखा कांशीराम पावरा (19 वर्ष मुली रेवाडी भाला फेक सुवर्णपदक प्रथम), संतोषी शरद पिपळसे (14 वर्ष मुली वारसा 100 मीटर धावणे रजत द्वितीय), भरत भुवनसिंग पावरा (17 वर्ष मुले चोपडा जीन शिरपूर 100 मीटर धावणे व लांब उडी 2 ही खेळ प्रकारात द्वितीय रजत पदक प्राप्त), क्रांती मधुकर पवार (17 वर्ष मुली वारसा 100 मीटर धावणे द्वितीय रजत), मंजुषा भुरला पावरा (17 वर्ष मुली कुसुबा द्वितीय रजत), आलिशाबी हिराजी मावळी (19 वर्ष मुली सामोडे लांब उडी तृतीय कांस्य), बियाराम भाईदास पावरा (14 वर्ष मुले सांगवी उंच उडी तृतीय कांस्य), राणी रड्या भारुडे (17 वर्ष मुली देवळी पाडा थाळी फेक तृतीय कांस्य), दीपाली मुरलीधर अहिरे (14 वर्ष मुली वारसा 600 मीटर धावणे तृतीय कांस्य पदक विजेता) असे धुळे प्रकल्पाचे राज्यस्तरांवर 97 सहभागी खेळाडू पैकी 85 खेळाडूंनी नाशिक विभागाचे नेतृत्व करतांना प्रावीण्य प्राप्त केले. 6 चषक, 15 पदके सांघिक आणि वैयक्तिक खेळ प्रकारात प्राप्त केले.
यावेळी प्राविण्य प्राप्त खेळाडूंना आदिवासी विकास विभागाचे आयुक्त नयना गुंडे, अपर आयुक्त संदीप गोलाईत, तुषार माळी, सुरेश वानखेडे, उप आयुक्त अविनाश चव्हाण, सुदर्शन नगरे, प्रदीप पोळ यांच्यासह पवार साहेब, प्रमोद पाटील, दिलीप मोरे, शशिकला अहिरराव, वर्षा सानप, अनिल महाजन, निंबा कापडणीस, सुनील नेरकर, सह आदिवासी विकास विभागाचे अधिकारी यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
धुळे प्रकल्पाच्या यशस्वी कामगिरीचे शिल्पकार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (भाप्रसे) धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ जानगर, पी.के.ठाकरे, भटू आव्हाड, विजय भडगावकर, स. ले. महेंद्र देवरे, सतीश काकड, जयश्री देवरे, अविनाश पाटील, सचिन चौधरी, संदीप पाटील, विजय खैरनार, विजय जाधव, युवराज चव्हाण, कुणाल भधाने, कल्पना दशपुते, कल्पना सोनवणे, वैशाली सूर्यवंशी, प्रतिभा पाटील, विजया गवळी, आरिफ शेख, महेश भवरे, अनिल राऊत, अनिल ठाकरे, मंगेश ठाकरे, अजय चौधरी, जगन पवार, प्रकाश सोनवणे, सुहास पाटील, जगन पवार, प्रकाश मोहणे, सुभाष ठाकरे, काशीनाथ महाले, पी. के. पवार, मनोज निकम, हर्षल अहिरे, संजय अहिरे यांच्यासह धुळे प्रकल्पातील आश्रम शाळा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी, धुळे प्रकल्प क्रीडा समिती सदस्य व क्रीडा मार्गदर्शक धनंजय सोनवणे, अनिल खैरनार, वैभव सोनवणे, आशिष जगताप यांचे प्रावीण्य प्राप्त खेळाडू यांनी परिश्रम घेतले, अशी माहिती धुळे प्रकल्प क्रीडा समन्वयक विजय खैरनार यांनी दिली.