प्रचिती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत
शिरपूर वॉटर पार्कला केली धम्माल

पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर यांच्या वतीने दिनांक 29 नोव्हेंबर २०२५, शनिवार रोजी शिरपूर येथील वॉटर पार्क मध्ये एलकेजी ते आठवी च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध जलप्रदायांचा अनुभव घेतला आणि निसर्गाचे सानिध्यात मजा लुटली या एका दिवसाच्या सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण ठरला. या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन आदरणीय प्रशांत पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत अश्विनी पगार मॅडम आणि सरिता खैरनार मॅडम यांनी अत्यंत प्रभावी समन्वय साधला असून त्यांना प्राचार्या अनिता पाटील मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या सहलीत प्राचार्य अनिता पाटील मॅडम यांच्यासह अश्विनी मॅडम, सरिता मॅडम, किरण मॅडम, अर्चना मॅडम, सुनिता मॅडम, योजना मॅडम, सायली मॅडम, शितल मॅडम, जागृती मॅडम, मयुरी मॅडम, पल्लवी मॅडम आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उत्साहपूर्ण सहभाग होता.
सकाळी विद्यार्थी उत्साहात एकत्र जमा झाले. शिक्षकांचे मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने बसमध्ये प्रवेश केला.विद्यार्थी सकाळी सात वाजता शाळेतून निघाले आणि रात्री बारा वाजता परतले. शाळेने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वाहतुकीची उत्तम व्यवस्था केली होती त्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षकांचे गट तयार केले होते, यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती व संख्या मोजण्याची जबाबदारी किरण मॅडम सरिता मॅडम यांनी पार पाडली.सहलीच्या ठिकाणी तीन वेळ नाश्ता व जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती, नाश्ता व जेवण वितरणाची जबाबदारी सरिता मॅडम व अर्चना मॅडम, अश्विनी मॅडम यांनी घेतली तसेच सायली मॅडम व शीतल मॅडम यांनी देखील सहकार्य केले, सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतला. सहलीत विद्यार्थ्यांसाठी विविध रोमांचक खेळांची व्यवस्था करण्यात आली होती, जसे की, चौथी ते आठवीचे विद्यार्थ्यांसाठी बोटिंग, बटरफ्लाय सायकल, एलकेजी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोपस राईड, जम्पिंग फ्रॉग, तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी ट्रेन राईड, फ्लाइंग चेअर, इत्यादी विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रमांमध्ये हसत खेळत उत्साहाने सहभाग नोंदवला. विद्यार्थी खेळ खेळत असताना सर्व शिक्षीकांनी प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष ठेवले आणि सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल याची खात्री घेतली. विद्यार्थ्यांची वस्त्र परिवर्तन (कपडे बदलणे) या विभागात अर्चना मॅडम, योजना मॅडम, सरिता मॅडम, सुनीता मॅडम, जागृती मॅडम,व मावशी यांनी मुला-मुलींची काळजीपूर्वक मदत केली. सहलीच्या छायाचित्रनाचे व व्हिडिओ शूटिंग चे काम जागृती मॅडम व मयुरी मॅडम यांनी उत्कृष्ट रित्या रेखाटले. बातमी लेखनाचे कार्य प्रेरणा नांद्रे मॅडम यांनी सांभाळले.रात्री विद्यार्थी समाधानाने आणि नवीन आठवणी घेऊन शाळेत परतले व नंतर आपापल्या घरी सुखरूप पोहोचले.
या सहलीमुळे विद्यार्थ्यांना जलक्रीडा आणि मनोरंजन याविषयीची माहिती मिळाली. तसेच, त्यांना निसर्गरम्य वातावरणात आनंद घेण्याची संधी मिळाली. ही सहल केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नव्हती, तर यातून विद्यार्थ्यांनी एकत्र राहणे, शिस्त आणि सुरक्षितता यांसारख्या गोष्टी शिकल्या. शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे ही संपूर्ण सहल यशस्वी, आनंदी, सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरिता पार पडली. विद्यार्थ्यांना ही सहल अविस्मरणीय अनुभव असण्याचे सांगितले. शेवटी शाळा व्यवस्थापन आणि सहलीला योगदान देणाऱ्या सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
















