प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे
रंगोत्सव पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न








पिंपळनेर: प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर – रंगोत्सव पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्नप्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर यांच्या वतीने आज दिनांक ६ डिसेंबर २०२५, शनिवार रोजी ‘रंगोत्सव’ चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या उपक्रमात इयत्ता LKG ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी पेन्सिल स्केचिंग, कलर पेंटिंग, हस्ताक्षर अशा विविध कलात्मक उपक्रमांमध्ये आपले कौशल्य प्रभावीपणे सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
* मार्गदर्शन व आयोजन
या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन आदरणीय प्रशांत पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी अश्विनी पगार मॅडम यांनी उत्तम प्रकारे पार पाडली, त्यांना प्राचार्य अनिता पाटील मॅडम व शाळा समन्वयक राहुल अहिरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मोलाचे ठरले.
* विशेष सन्मान
प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर यांनाही उत्कृष्ट आयोजन व प्रभावी सहभागाबद्दल सन्मानचिन्ह प्रदान करून गौरवण्यात आले.
यानंतर प्राचार्या अनिता पाटील मॅडम यांना “The Leadership in Education Award” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच शाळा समन्वयक राहुल अहिरे सर यांना “Rene Magritte Award” प्रदान करण्यात आला.
कला क्षेत्रातील सृजनशीलतेला प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दिशा देणे आणि नवकल्पनात्मक उपक्रम राबविण्याबद्दल हा सन्मान त्यांना देण्यात आला, व शिक्षिका अश्विनी पगार मॅडम यांना देखील विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता व कल्पनाशक्ती प्रोत्साहित करून नवकल्पनात्मक उपक्रम राबवण्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
* पारितोषिक वितरण
स्पर्धेतील विविध गटांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांनाट्रॉफी, पदके आणि प्रमाणपत्रे प्रदान करून गौरवण्यात करण्यात आले. शिक्षकांकडून विद्यार्थी विजेत्यांचे जोरदार स्वागत कौतुकाने करण्यात आले. विजयाच्या क्षणांचे चित्रिकरण आणि फोटोसेशनचे कार्य शिक्षिका प्रतिक्षा अहिरे मॅडम यांनी उत्तमरीत्या पार पाडले.
कार्यक्रमाचे बातमी लेखन आणि प्रेरणा नांद्रे मॅडम यांनी उत्कृष्टरीत्या केले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
















