कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्ग; प्रस्तावित विधान भवन आणि चर्चगेट स्थानकांची केली पाहणी
मुंबई :- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मार्फत सुरू असलेल्या मुंबई मेट्रो लाईन ३ या भूमिगत प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उशिरा रात्री आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत संचालक प्रकल्प श्री एस के गुप्ता आणि इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कफ परेड ते सीप्झ दरम्यान प्रस्तावित असलेल्या या मेट्रो मार्गाचे सद्यस्थितीत काम प्रगतीपथावर आहे. मेट्रो 3 सारखा तांत्रिकदृष्ट्या कठीण प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान कॉर्पोरेशनचे अधिकारी लीलया पेलत असल्याचे म्हणत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी एमएमआरसीएलच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
डिसेंबर २०२३ पर्यंत आरे ते बीकेसी दरम्यान (फेस १) मेट्रो मार्गिका ३ सुरू करण्याचे नियोजित असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या आढावा दरम्यान महत्त्वाच्या सूचना केल्या. तसेच सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले.
विधान भवन स्थानकाचे ८८% काम तर चर्चगेट स्थानकाचे ८३%काम पूर्ण झाले आहे. मेट्रो 3 कार्यान्वित झाल्यावर ही दोन्ही स्थानके चाकर मान्यांसाठी वरदान ठरणार आहेत.