पिंपरी : भाजपच्यावतीने स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनानिमित्त पिंपरी येथील भाजपा कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष शंकर जगताप, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच, त्यांचे कार्य सर्व भाजप कार्यकर्त्यांनी एक जुटीने पुढे न्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
प्रसंगी, माजी नगरसेवक अमृत पऱ्हाड यांचे दुःखद निधन झाले. त्यांना देखील पक्षाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या 1982 पासूनच्या आठवणींना शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी उजाळा दिला. यावेळी मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, सरचिटणीस नामदेव ढाके, अजय पाताडे, प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस अनुप मोरे, प्रदेश सदस्य माऊली थोरात, माजी नगरसेवक सागर अंगोळकर, अल्प संख्याक सेलचे शाकीर शेख, महिला मोर्चाच्या सरचिटणीस वैशाली खाड्ये, मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, निलेश अष्टेकर, माजी स्वीकृत सदस्य मोरेश्वर शेडगे, जिल्हा चिटणीस राजश्री जायभाय, सोनाताई गडदे, जयश्री मकवाना, नंदू भोगले, विजय शिनकर, बाळासाहेब भुंबे, रवी देशपांडे, शिवदास हांडे, श्री नागरगोजे, नंदू कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.