Chaupher News
पुणे : जून्नर येथील किल्ले शिवनेरीवर आज तिथीनुसार शिवजयंती निमित्त शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला.
सकाळी गडदेवता शिवाईदेवीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिवाई देवी मंदिर ते शिवजन्मस्थान असा छबिना पालखी सोहळा पार पडला. यावेळी ध्वजारोहण, पोवाडे गायन कार्यक्रम आणि राजमाता जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळा असे अनेक कार्यक्रम पार पडले. यंदाचा राजमाता जिजाऊ पुरस्कार जुन्नर येथील आदर्श शिक्षिका मनीषा आकाराम कवडे यांना प्रदान करण्यात आला.