चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये होळीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक रवींद्र सोनवणे सरांनी होळीनिमित्त माहिती देताना सांगितले की फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिका उत्सव.यालाच होळी असे म्हणतात. होळी विषयी कथा सांगितली की हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णूचा लाडका भक्त होता बघतो होता हिरण्यकश्य पुने त्याचा छळ केला प्रल्हादाने श्रीविष्णूचे नाव घेऊ नये.म्हणून हिरण्यकश्यपू ने त्याला उंच कड्यावरून खाली टाकले. उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. तरीही भक्त प्रल्हादावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही.तो तसाच्या तसा राहिला शेवटी हिरण्यकश्यपू बहिण म्हणाली मला वर लाभल्यामुळे अग्नीपासून मला कोणतेच भय नाही मी जळणार नाही. मी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते. त्याप्रमाणे हिरण्यकश्यपूची बहीण हुंडा प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नित बसली. सभोवती गोऱ्या रचून पेटविले गेले.पण काय आश्चर्य वर मिळालेली हुंठा अग्नीत जळून भस्म झाली. भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतून जसाच्या तसा सुखरूप बाहेर आला. जे वाईट होते ते जळून गेले जे अस्सल होते ते तापवून शुद्ध बनले. प्रल्हादाची जणू ही अग्निपरीक्षाच होती. त्याची आठवण म्हणून होळी पेटवली जाते हीच ती होळी म्हणून होळीचे महत्त्व आहे होळीत रंग खेळण्याची प्रथा आहे असे सांगितले .सपना देवरे मॅडम माहिती देताना सांगितले कीआपले शरीर साथ धातूंचे व सप्तरंगांचे बनले आहे.म्हणूनच इंद्रधनुष्य सर्वांना आनंददायी वाटतो.आपल्या शरीराला विविध रंगांची आवश्यकता असते. त्या रंगांची
कमतरता असल्याने आपण अनेक उपाय करतो. त्या ऐवजी सर्व रंगांचे मिश्रण रंग खेळल्याने होते.पण रंग कोणते तर साग पळस शिंगाड्याच्या पिठापासून बनविलेला गुलाल, अबीर, चंदन अशा वस्तूंपासून बनविलेला रंग वापरतात.याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी रंग उधळले याप्रसंगी शाळेचे शिक्षक कुणाल देवरे सर व वैष्णवी देवरे मॅम यांच्या हस्ते होळीस नैवेद्य दाखवून होली दहन करण्यात आली. या होळी दहनांमध्ये सर्वांनी आपल्यातील अवगुण लोभ, मत्सर अहंकार, क्रोध, हिंसा,द्वेष त्यांना नाहीसा करावा असा संदेश देण्यात आला..या कार्यक्रमाचे संयोजन नितीन राजपूत सरांनी केले.याप्रसंगी शाळेचे प्राचार्या, व्यवस्थापक, शिक्षक वर्ग , कर्मचारी वर्ग उपस्थित होते..