पुणे:- पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग -१ ते वर्ग-३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे.
त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात क्र. १/१३६२ नुसार वर्ग -१ मधील ८ पदे, वर्ग -२ मधील २३ पदे व वर्ग -३ मधील २८९ पदे अशा एकूण ३२० पदाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याचा कालावधी दिनांक ०८/०३/२०२३ पासून ते दिनांक २८/०३/२०२३ रोजी पर्यंत आहे.
इच्छुक उमेदवारांनी https://pmc.gov.in/mr/recruitments या लिंकवर दिनांक २८/०३/२०२३ रोजीचे २३: ५९ वाजेपर्यंत online पद्धतीने अर्ज करावा.
उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in/mr/recruitments या लिंकवर पाहण्यास उपलब्ध आहेत.