पिंपरी : योनेक्स– सनराईज व पुजा डिस्ट्रीक मेट्रोपॉलीटन बॅडमिंटन असोसिएशन तसेच पिंपरी चिंचवड सामाजिक विकास मंच यांच्या सहकार्याने आमदार उमाताई खापरे प्रायोजित योनेक्स – सनराईज “नमो चषक” जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे दि. २ ते ४ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. युनिर्व्हसल बॅडमिंटन अकेडमी, काका होम्स शेजारी, साईलीला सोसायटी जवळ, रहाटणी येथे स्पर्धा होतील. वयोवर्ष १३, १५, १७ च्या आतील मुले व मुली एकेरी आणि १७ वर्षाखालील मुले व मुली दुहेरी अशी स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेत प्रथम पारितोषिक ५००१ व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक ३००१ रुपये व ट्रॉफी देण्यात येणार आहे. सदर स्पर्धा ही फेदर शटल ने खेळविल्या जातील. स्पर्धेच्या प्रवेशिका ३१ डिसेंबर २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत स्विकारल्या जातील. स्पर्धेस प्रवेश शुल्क फी एकेरी स्पर्धक रु. ५००/- प्रतिप्रवेश व दुहेरीसाठी रु.१००० रुपये असेल. सदर स्पर्धेच्या प्रवेशिका व फी PDMBA (pdmba.zeetius.com) च्या पोर्टलवर पाठविण्यात यावे. प्रवेशिका कमी आल्यास निर्णय आयोजक घेतील. स्पर्धेबाबत अंतीम निर्णय आयोजकांचा राहील, अशी माहिती स्पर्धेचे आयोजक भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) सरचिटणीस संजय मंगोडेकर, उद्योजक अनिरुध्द प्रधान यांनी दिली आहे.