पिंपळनेर : नवीन वर्षात स्वतःसाठी ध्येय निश्चित करा. प्रत्येकासाठी काही ना काही ध्येय असणे आवश्यक आहे. भविष्यात सुधारणा करण्यासाठी तुम्ही काय करू शकता आणि कोणत्या दिशेने प्रयत्न करायचे आहेत हे ठरवल्यानंतर ते पूर्ण करण्याची प्रतिज्ञा घ्या. तुमचा दृढनिश्चय तुम्हाला तुमचे ध्येय पूर्ण करण्याची नेहमी आठवण करून देईल, असे मत प्रचिती पब्लिक स्कूलचे समन्वयक राहूल पाटील यांनी केले. येथील प्रचिती पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांनी नवीन वर्ष साजरे केले. या कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक राहुल पाटील, मुख्याध्यापिका अनिता पाटिल उपस्थित होत्या. राहुल पाटील यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी मोबाईल न बघण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी नवीन वर्षात चांगल्या सवयी लावण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमासाठी सुंदर असे फललेखन व सुंदर अशी रांगोळी रेखाटण्यात आली. सुत्रसंचालन मंगला बहिरम यांनी केले. किरण देवरे यांनी नवीन वर्षाविषयी अधिक माहिती सांगितली. इयत्ता ७ वी, ६ वी, ५ वी व ४ थीच्या विद्यार्थीनी रॅम्प वाक करून नवीन वर्षाचे स्वागत केले.
वर्ष २०२४ उजळले आहे. वर्षाची सुरुवात उत्साहाने आणि आनंदाने करू यात. येणारे वर्ष नशीब घेऊन येईल अशी आशा आहे. २०२४ पासून नवीन वर्ष आयुष्यात अनेक चांगले बदल घडवून आणेल अशी अपेक्षा आहे. आनंद आणि प्रगती होईल. जरी कॅलेंडर आणि तारीख बदलल्याने आयुष्य बदलत नाही. आनंद आणि यशासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. तसेच काही चांगले बदल करावे लागतील. जीवनात बदल करण्याचा निर्धार करून नवीन वर्षाचे काही संकल्प करा. नवीन वर्ष कसे चांगले करता येईल हा या संकल्पांचा उद्देश आहे. हा संकल्प तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर प्रोत्साहन देईल. मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत नववर्षाचे संकल्प करायला हवेत. हे संकल्प वाईट गोष्टी दूर करण्यासाठी आणि नवीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करण्ण्यासाठी कार्य करतात, असे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.