प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम
साक्री – : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्या हस्ते सरस्वती माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. एलकेजी ची विद्यार्थिनी अनया ठाकरे, लावण्या सोनवणे, सेजल अहिरराव, इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी चैतन्या गांगुर्डे यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली. याप्रसंगी युकेजी अरहान शहा, निशा भामरे, इयत्ता चौथीची विद्यार्थिनी आरोही देसले, इयत्ता पाचवी उन्नती पवार या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले विषयी भाषणे केली. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. वयाच्या अवघ्या नव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाह नंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकविले स्त्री शिक्षणाचा पाया रचला, असे मनोगत यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. शाळेच्या शिक्षिका गीतांजली काकुस्ते यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली. सावित्रीबाईंनी बालविवाह, केशव पण, सती प्रथा अशा वाईट प्रथांना विरोध केला. त्यांनी काव्य फुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर असे काव्य संग्रह लिहून समाजकृती केली. शाळेच्या शिक्षिका देवका सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती विशद केली. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ.वैशाली लाडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती देताना सांगितले की सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच मुली व महिला शिक्षण क्षेत्रात असो या उद्योग क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र,सामाजिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सूत्रसंचालन तुषार सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन जागृती जाधव यांनी केले.सुंदर फलक लेखन भूपेंद्र साळुंखे यांनी केले. याप्रसंगी सर्व विद्यार्थी वर्ग व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.