पिंपळनेर : सावित्रीबाई फुले यांनी महिला आणि मुलींना प्रेरणा दिली आहे. सावित्रीबाई फुले देशातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत. त्यांनी महिला सशक्तीकरणाकरिता आपल संपूर्ण जीवन समर्पित केलं, असे मत समन्वयक राहुल पाटील यांनी व्यक्त केले. प्रचिती पब्लिक स्कुल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमास शाळेचे समन्वयक राहुल पाटील, मुख्याध्यापिका अनिता पाटील उपस्थित होत्या. राहुल पाटील यांनी भाषणातून विद्यार्थिनींना सावित्रीच्या लेकी संबोधून सावित्रीबाई यांच्याविषयी माहिती सांगितली. तसेच मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी एक स्त्री शिकली, तर कुटुंब शिकते. कुटुंब शिकले तर पूर्ण समाज शिकतो. स्त्रीच स्थान ‘चुल व मुल नसून ती वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात प्रगती करत असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच, मंगला बहिरम यांनी “एक स्त्री कभी हारती नही है। उसे हराया जाता है। लोग क्या कहेंगे यह कहकर डराया जाता है ।“ असे सांगितले. तसेच इयत्ता १ ली च्या विद्यार्थीनी सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली. प्रसंगी त्यांची जयंती ‘बालिका दिन’ म्हणूनही साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी सुंदर असे फलक लेखन करण्यात आले. सुत्रसंचालन धनश्री आघाव यांनी केले. आभार प्रदशनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपास्थित होत्या.