प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती साजरी
पिंपळनेर : येथील प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रतिमेचे पूजन समन्वयक राहुल पाटील, अनिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अर्चना मॅडम यांनी स्वामी विवेकानंद, माता जिजाऊ यांचे कार्य विद्यार्थांसमोर कथन केले. त्यानंतर अश्विनी मॅडम यांनी आपल्या गोष्टीतून विद्यार्थ्यांना बोध दिला व सरिता मॅडम यांनी जिजाऊचे कार्य किती महान व त्यांनी शिवाजीना कसे घडवले हे विद्यार्थ्यांना सांगितले काजल मॅडमनी सर्वाचे आभार प्रदर्शन केले. चैताली भदाणे, अन्वी पवार, यज्ञेश नेरकर, अर्णवी काकुस्ते या विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
प्रसंगी, स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शाळेच्या प्राचार्य अनिता पाटील, समन्वयक राहुल पाटील यांच्यासह शाळेच्या शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते. स्वामी विवेकानंद या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी महापुरुषांची वेशभूषा साकारून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कल्याणी काकुस्ते यांनी केले.






