स्पर्धेचा प्रथम मानकरी ठरला रहीम इलेव्हन संघ
पिंपरी:– पिंपरी येथील श्री. संदीप बाळकृष्ण वाघेरे युवा मंचच्या वतीने आयोजित पिंपरी करंडक २०२२ – २३ च्या तिसऱ्या पर्वाचा बक्षीस वितरण समारंभम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पुणे येथील रहीम इलेव्हन संघाने पटकावले.
यावेळी मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे, विधानसभा आमदार अण्णा बनसोडे, विधान परिषद आमदार उमाताई खापरे, माजी नगरसेवक नाना काटे, संदीप वाघेरे, शत्रुघ्न काटे, हर्षल ढोरे, शितल शिंदे, कैलास बारणे, कुणाल लांडगे, चंद्रकांत नखाते, मोरेश्वर शेडगे, संतोष कुदळे, सामजिक कार्यकर्ते देवदत्त लांडे, गणेश ढाकणे, कैलास सानप, संजय गायखे आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाना बक्षिसे तर स्पर्धकांना देखील उत्तेजनार्थ ट्रॉफीचे वाटप करण्यात आले.
या स्पर्धेत एकूण ८८ संघांनी सहभाग नोंदवला. रहीम इलेव्हन संघ पुणे यांनी दमदार कामगिरी करीत स्पर्धेचे कै.सौ.सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ १,१२,०००/- रुपये व चषक असलेले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तर कै.सौ.सविता सुभाष वाघेरे यांचे स्मरणार्थ द्वितीय क्रमांकाचे ७१,०००/- रुपयांचे पारितोषिक आणि चषक देहूरोड क्रिकेट संघ देहूरोड, तृतीय क्रमांकासाठी कै.श्री.दत्तोबा हरिभाऊशेठ वाघेरे यांच्या स्मरणार्थ ३१,०००/- रुपयांचे पारितोषिक आणि चषक झुंजार क्रिकेट संघ पिंपरी, कै.श्रीमती रंगुबाई निवृत्ती कुदळे यांच्या स्मरणार्थ चतुर्थ क्रमांकासाठी २१,०००/- रुपयांचे पारितोषिक आणि चषक नगरसेवक राजेंद्र जगताप स्पोर्ट फौंडेशन तसेच ४० वर्षावरील खेळाडूंसाठी (४० प्लस) कै. श्री योगेश पोपटराव वाघेरे यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकासाठी ३५,०००/- रुपयांचे पारितोषिक आणि चषक रहीम इलेव्हन संघ देहूरोड व कै.श्री.राजेश शंकर गायकवाड यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकासाठी २५,०००/- रुपयांचे पारितोषिक व चषक पिंपरी इलेव्हन संघ पिंपरी यांना देण्यात आले.
तसेच सालाबादप्रमाणे श्री.संदीप वाघेरे यांच्या २०२३ वर्षीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संदीप वाघेरे यांच्या सुमारे २०,००० प्रतींचे वाटप पिंपरी गाव व परिसरामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती वाघेरे यांनी दिली.
माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने २५ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे नियोजन राजेंद्र वाघेरे, संदीप नाणेकर, सचिन वाघेरे, युवा मंचाचे अध्यक्ष हरिष वाघेरे, रोहित लाळगे, किरण वाघेरे, राहुल वाघेरे, अभिजित चव्हाण यांनी केले.