नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Bombay High Court Nagpur Bench) एका प्रकरणात 28 वर्षीय तरुणाची शिक्षा रद्द करताना महत्त्वाचा निर्णय दिला आहे. अल्पवयीन मुलीच्या पाठीवर आणि डोक्यावर कोणताही गैर हेतू न ठेवता केवळ प्रहार केल्याने तिच्या विनयशीलतेला बाधा येत नाही. असं न्यायालयानं म्हण्टलं आहे.
हे प्रकरण 2012 चं आहे, जेव्हा एका 28 वर्षीय तरुणावर 12 वर्षांच्या मुलीची विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिच्या पाठीवर आणि डोक्यावर हात फिरवला होता. या प्रकरणी तरुणाची शिक्षा रद्द करताना न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकल खंडपीठाने सांगितले की, यामझ्ये दोषीचा काही चुकीचा हेतू होता असे दिसत नाही, उलट त्याच्या बोलण्यातून असे दिसते की तो फक्त पीडितेला लहानपणापासुन पाहत होता. “एखाद्या महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्यासाठी, तिच्या विनयशीलतेचा अपमान करण्याचा कोणीतरी हेतू आहे हे महत्वाचे आहे …” आरोपीवर करण्यात आलेला आरोप त्यासाठी पुरेसे नाहीत. केवळ डोक्यावरुन आणि पाठीवरुन कोणताही लैंगिक उद्देश नसताना हात फिरवणे म्हणजे विनयभंग म्हणता येणार नाही.
नेमकं प्रकरण काय?
फिर्यादीनुसार, 15 मार्च 2012 रोजी अपीलकर्ता 18 वर्षांचा होता आणि काही कागदपत्रे देण्यासाठी ती मुलीच्या घरी गेली होती. त्यावेळी मुलगी घरात एकटीच होती. त्याने मुलीच्या डोक्यावर आणि पाठीवर हात फिरवला ज्यामुळे ती घाबरली आणि मदतीसाठी ओरडली. या प्रकरणी ट्रायल कोर्टाने त्याला दोषी ठरवून सहा महिन्यांची शिक्षा सुनावल्यानंतर या व्यक्तीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य नव्हता आणि प्रथमदर्शनी असे दिसते की त्या व्यक्तीने कोणताही विचार न करता, चुकीच्या हेतूशिवाय कृती केली.