चंद्रभागा कॉर्नर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मोफत रक्त व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
रावेत : चंद्रभागा कॉर्नर ज्येष्ठ नागरिक संघ व निदान पॅथॉलॉजी लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्त व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात होते. सामाजिक कार्यकर्ते दीपक भोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात रविवारी सकाळी शिबिर घेण्यात आले. शिबिरामध्ये शरीरातील रक्ताचे प्रमाण, पेशींचे प्रमाण, शरीरातील साखरेचे प्रमाण तसेच इतर सर्व तपासण्या करण्यात आल्या. शिबिरात 78 ज्येष्ठ नागरिकांनी विविध तपासण्यांचा लाभ घेतला. सामाजिक कार्यकर्ते दिपक भोंडवे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी, सामाजिक कार्यकर्ते संतोष (अप्पा) भोंडवे, संघाचे अध्यक्ष सतेजकुमार चौधरी, उपाध्यक्ष प्रभाकर जाधव, सचिव विलास पाचपांडे, सेखा फिरके, अशोक जोशी, लता झोपे, विष्णुपंत गुल्हाने, रमाकांत साळवे, दत्तात्रय मानमोडे, चुडामण बेंडाळे, सुरेश काळे, नंदकिशोर सूर्यवंशी, पांडुरंग वडनेरे, मनोहर पाटील, अशोक ए.जोशी, अरविंद सहस्रबुद्धे, मधुकर कदम, विनोद पाटील, दशरथ लोखंडे, दादाराव आंबोरे, कमल बडगुजर, गीता पाचपांडे, शैला झोपे, सुजाता चौधरी, मंदा आनंदकर, मालन अहिरवडे, सुनिता बेंडाळे, सरला पाटील आदी उपस्थित होते,