प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने 21 डिसेंबर रोजी “फन फेअर” कार्यक्रमाचे आयोजन
प्रसिद्ध अहिराणी कलाकार सचिन कुमावत, पुष्पा ठाकूर आणि कॉमेडियन विलास शिरसाठ राहणार प्रमुख आकर्षण
साक्री : तालुक्यातील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल आणि ज्यू कॉलेजच्या वतीने यंदा प्रथमच “आनंद मेळावा” (फन फेअर) या धम्माल मस्ती कार्यक्रमाचे जल्लोषात आयोजन करण्यात आले आहे.
साक्री – पिंपळनेर मार्गावरील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल आणि ज्यू कॉलेज येथे शनिवार, दि. 21 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत आनंद मेळावा जल्लोषात साजरा होणार आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना एकत्र येऊन मनोरंजन आणि ज्ञानाचा आनंद घेण्याची संधी प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व कॉलेजचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी याव्दारे उपलब्ध करून दिली आहे.
आनंद मेळावा (फन फेअर) या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अहिराणी भाषेतील “ओ मनी माय व बबल्या इकस केसावर फुगे”, “सावन ना महिना मा” या गीतांचे फेम प्रसिद्ध डान्सर सचिन कुमावत आणि पुष्पा ठाकूर यांचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
साक्री तालुक्यात पहिल्यांदाच फन फेअर मध्ये महिलांसाठी होम मिनिस्टरचा खेळ प्रचिती इंटरनॅशनल स्कूल आणि ज्यु कॉलेज, साक्री येथे घेतला जाणार आहे. यामध्ये तीन विजेत्या महिलांना अहिराणी कलाकार सचिन कुमावत आणि पुष्पा ठाकूर यांच्या हस्ते पैठणी दिली जाणार आहे.
महिलांसाठी असणारा होम मिनिस्टर हा कार्यक्रम मुंबईचे विलासकुमार शिरसाठ (अभिनेता, नकलाकार, हास्य कलाकार, निवेदक टीव्ही मालिका, चित्रपट, हिंदी मराठी अहिराणी एकपात्री विनोदी कलाकार) हे सादर करणार आहेत. कार्यक्रमादरम्यान मजेशीर प्रश्नाची उत्तरे देणाऱ्या विजेत्या प्रेक्षकांना आकर्षक बक्षीस दिली जाणार आहेत. तसेच, वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टॉल्स लावण्यात येणार असून त्यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या धम्माल मस्तीसाठी खेळणे व पाळण्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनमुराद आनंद लुटता येणार आहे. पाल्यांमध्ये सृजनशीलता आणि सामूहिक भावना वृद्धिंगत होण्यासाठी महिला व पालकांनी कुटुंबासह आनंद मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी केले आहे. प्राचार्य वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे, शिक्षक आणि शिक्षकेतर व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनात “आनंद मेळावा” घेण्यात येणार आहे. त्यामुळे या धम्माल मस्तीच्या कार्यक्रमासाठी आपला वेळ राखून ठेवा.