प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे “नाताळ” सण उत्साहात साजरा
पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे ‘नाताळ’ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची माहिती व सणाचे महत्त्व सांगण्यात आले. यावेळी शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रसंगी, व्यवस्थापक राहुल पाटील, प्राचार्य अनिता पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. प्राचार्य अनिता पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना नाताळ सणाविषयी मनोहर गोष्ट सांगितली. तसेच राहुल पाटील यांनी शाळेत येशु ख्रिस्त याच्या जन्माची व बायबल ग्रंथाची माहिती दिली.
या सणानिमित्त संपूर्ण शाळेत सुंदर सजावट अर्चना देसले, योजना जाधव, अनिता पवार यांनी केले. सुंदर अशी रांगोळी जागृती बिरारीस व सुनिता जाधव यांनी काढली. नाताळ या सणाच्या निमित्त आकर्षक असे फलक लेखन किरण देवरे, अनिता पाटील यांनी केले. क्रिसमस ट्री डेकोरेशन रिनल सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन रिनल सोनवणे यांनी केले. तसेच LKG च्या विद्यार्थिनींनी मेरी ख्रिसमस या गाण्यावर सुंदर नृत्य सादर करून कार्यक्रमात बहार आणली. या नृत्याची कोरिओग्राफ कल्याणी काकुस्ते यांनी केले. रुपेश कुवर यांनी नाताळ सणाविषयी माहिती सांगितली. तसेच युकेजी मधील उर्जित कोतकर यांनी सांताक्लॉजची भूमिका साकारून सर्वांचे लक्ष वेधले. तसेच, आठवीतील ऋषीकेश जाधव याने सांताक्लॉज बनून मुलांवर चॉकलेट चा वर्षाव केला. या कार्यक्रमाप्रसंगी प्री-प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी केक कापला. स्कूलतर्फे सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट व केकचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक अश्विनी पगार, मयुरी सोनार, सरिता खैरनार शिक्षकेतर कर्मचारी पल्लवी अहिरे, समाधान सोनवणे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैशाली वाघ यांनी केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात झाली.