प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये आनंद मेळावा; स्वादिष्ट पदार्थ चाखत विद्यार्थ्यांनी लुटला खेळाचा आनंद
पिंपळनेर : येथील प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही आनंद मेळावा रविवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला.
समोसा, कचोरी, पाणीपुरी, गुलाबजाम, खमंग, मिसळ पाव, मसाला पापड तसेच इतर घरगुती स्वादिष्ट पदार्थाची चव घेत आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला.
आनंद मेळावा कार्यक्रमाला शाळेचे संस्थापक प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत पाटील, सचिव कविता पाटील, प्राचार्या अनिता पाटील, व्यवस्थापक राहुल अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत लेझीम या नृत्याने करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. इ. ४ थी व ५ वी च्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे नृत्य सादर करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. त्यांना अश्विनी पगार यांनी मार्गदर्शन केले. आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी मोठा आनंद घेतला.
शाळेतील विद्यार्थ्यांना आनंद मेळाव्यात जीवनातील व्यावहारिक ज्ञान, खरेदी विक्री यांचे न्यान मिळाले. तसेच वेगवेगळे खाद्यपदार्थांची चव चाखण्यास मिळाली.
विद्यार्थ्यांना फक्त शाळेतील किंवा पुस्तकाचे ज्ञान नाही तर इतरही ज्ञान मिळाले, त्यामुळे असे कार्यक्रम शाळेमध्ये आयोजित करण्याची भावना पालकांनी व्यक्त केली. आनंद मेळावा या कार्यक्रमानिमित्त शाळेमध्ये रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तसेच अहिराणी कलाकार सचिन कुमावत, हास्य कलाकार विलास शिरसाठ यांनी कार्यक्रमाला रंगत आणली. आनंद मेळावा या कार्यक्रमाचे नियोजन किरण देवरे, सुनिता जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना देसले यांनी केले. फलक लेखन योजना, अनिता पवार यांनी केले. कल्याणी काकुस्ते, मयुरी सोनार, वैशाली वाघ यांनी सुंदर अशी रांगोळी रेखाटली. सजावट रीनल सोनवणे, अश्विनी पगार , अर्चना देसले, जागृती बिरारीस यांनी केली. कार्यक्रमाचे छायाचित्र काजल राजपूत, रुपेश कुवर, चित्रफित कल्याणी काकुस्ते यांनी केले. आजच्या कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहू शोभा वाढविली. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने काजल राजपूत यांनी केली.