प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये ख्रिसमस साजरा; झिंगल नृत्याने वेधले सर्वांचे लक्ष
साक्री:- प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये ख्रिसमस (नाताळ) सण साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्या वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे, समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या स्वागतानंतर ख्रिसमस नाताळ विषयक माहिती सपना देवरे यांनी दिली. ख्रिसमस सण दरवर्षी 25 डिसेंबर रोजी येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून मोठ्या आनंदात ख्रिश्चन बांधव साजरा करत असतात. ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जाऊन येशूची प्रार्थना करतात. नवीन वस्तू व वस्त्र परिधान करत असतात. नाताळ सणाच्या शुभेच्छा देऊन एकमेकांना भेटवस्तू देतात, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सांताक्लाँजने सर्वांचे लक्ष वेधत सर्व विद्यार्थ्यांना विविध वस्तू व चॉकलेट भेट दिल्या. विद्यार्थ्यांनी सांताक्लॉज बरोबर झिंगल डान्स…झिंगल डान्स…. या गाण्यावर नृत्य सादर करून आनंद लुटला. एकमेकांना मदत करणे, भेटवस्तू देणे, परस्पर सहकार्य करणे, याची जाणीव विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातून करून देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीतू पंजाब यांनी केले. कार्यक्रमाची सजावट किरण गवळी, भूपेंद्र साळुंखे, दीपमाला अहिराव यांनी केलीे. सांताक्लाँजची उत्तम भूमिका प्रशांत ससले यांनी साकारली. कार्यक्रमाचे संयोजन राहुल पाटील यांनी केले. शेवटी सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम मोठ्या आनंदाचा पार पडला.