प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे आनंद मेळाव्यात’खान्देश-फेम’ कलाकारांची उपस्थिती; अहिराणी, मराठी – हिंदी गीतांवर विद्यार्थ्यांची धम्माल मस्ती
साक्री:- प्रचिती इंटरनॅशनल स्कूल यांच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष खान्देश भूषण प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेतून शाळेत “आनंद-मेळावा ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी, कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण खान्देश-फेम अभिनेता सचिन कुमावत, खान्देश क्वीन अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुष्पा ठाकूर आणि विनोदी कलाकार विलासकुमार शिरसाठ आणि उत्कृष्ठ, दिग्दर्शक, अभिनेता, कवी संदीप साकोरे, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, कविता पाटील, प्राचार्य वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे, राहूल पाटील यांच्या हस्ते माता सरस्वती, कलेची देवता नटराजन व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत सत्कारानंतर इ.४ थी ५वी.व इ.६ वी. वर्गातील विद्यार्थिनींनी ‘प्रणवल्य श्रीदेवी’हे स्वागत नृत्य सादर केले. त्यानंतर ‘होम मिनिस्टर खेळ”या कार्यक्रमाने चांगलीच रंगत आणली. यामध्ये, विनोदी कलाकार विलासकुमार शिरसाठ यांनी विद्यार्थी पालकांना विविध प्रश्न विचारत हशा पिकविला. प्रश्नावली स्पर्धेतील विजेत्या महिलांना संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, दिग्दर्शक अभिनेता-संदीप साकोरे यांच्या हस्ते विविध बक्षीसे देण्यात आले. यामध्ये सहभागी महिला माता-भगिनींनी उत्कृष्ट सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला.
खान्देश फेम अभिनेता सचिन कुमावत व खान्देश क्वीन अभिनेत्री पुष्पा ठाकूर यांनी “वाडी वाडी ये….. चंदनवाडी …..”फुगे घ्या फुगे”… या त्यांच्या प्रसिद्ध मराठी रिमिक्स गाण्यांवर उत्कृष्ट नृत्य सादर केले. श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. इ.७ वी. मधील विद्यार्थिनींनी “छबीदार छबी ” या मराठी रिमिक्स गाण्यावर उत्कृष्ट नृत्य सादर केले. त्या नृत्या पाठोपाठ मंगळागौरी नृत्य इ.४थी. ते ६वी. मधील विद्यार्थ्यांनी सादर केले. फुडसाँग मध्ये “मै तो रस्ते से जा रहा था!.. भेलपुरी खा रहा था.. या गाण्यावर आधारित इ.२री.ते ३रीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरणातून कार्यक्रमात रंगत आणली. “राम आयेंगे आयेंगे”….. या गाण्यावरती इ५वी.ते ६ वी.मधील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी उत्कृष्ट नृत्य सादर करत वातावरण भक्तिमय केले. कार्यक्रमाचा आनंद घेत सर्व पालक, माता- भगिनी, विद्यार्थी, विद्यार्थिनींनी, शालेय कर्मचारी यांनी खान्देशी पदार्थ मेजवानीचा आनंद घेत विविध खाद्य- पदार्थांचा आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांना जीवनातील आर्थिक व्यवहाराची देवाण-घेवाण याची जाणीव या कार्यक्रमातून झाली. शेवटी शाळेत घेण्यात आलेल्या किल्ला स्पर्धा, महाराष्ट्रस्तरीय क्रिकेट स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन अशा विविध स्पर्धांमध्ये विजयी विद्यार्थ्यांना खान्देश फेम अभिनेता सचिन कुमावत आणि खानदेश क्वीन अभिनेत्री पुष्पा ठाकूर यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच विनोदी हास्य कलाकार विलासकुमार शिरसाठ यांनी पुन्हा ‘होम मिनिस्टर खेळ’ या कार्यक्रमाचे संयोजन केले. या कार्यक्रमात बकेट बॉल, तळ्यात मळ्यात या विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या माता-भगिनी महिलांनी उत्स्फूर्तपणे या खेळांमध्ये सहभाग नोंदवत खेळ खेळून या कार्यक्रमाचा आनंद घेतला. राजश्री राजेंद्र पाटील (प्रथम), धनश्री सोनवणे (द्वितीय ) आणि तृतीय विजया राहुल पाटील या विजयी महिलांना खान्देश क्वीन अभिनेत्री पुष्पा ठाकूर व खान्देश फेम अभिनेता सचिन कुमावत यांच्या हस्ते पैठणी साडी व सेमी पैठणी साड्याचे बक्षीस देण्यात आले. विलास कुमार शिरसाठ यांनी अभिनेता जॉनी लिव्हर, मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर, अनिल कपूर या अभिनेत्यांची उत्तम मिमीक्री करत श्रोत्यांना मनमोहित केले.
विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये भारतीय विविध खाद्य- अन्नपदार्थांच्या संस्कृतीचे महत्त्व त्यांना लक्षात यावे. यासाठी व आर्थिक व्यवहाराची देवाण-घेवाण याची जाणीव व्हावी. हा कार्यक्रमाचा मूळ उद्देश लक्षात घेऊन हा बाल आनंद मेळाव्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमात “प्रणवल्य श्रीदेवी “स्वागत गीताचे संयोजन सपना ठाकरे, “छबीदार छबी “व “मंगळागौरी “या मराठी गाण्यांचे संयोजन रोहिणी मॅडम , फुडसाँग” मै तो रस्ते से जा रहा था.. या गाण्याचे संयोजन वैष्णवी देवरे, राम आयेंगे आयेंगे या गाण्याचे संयोजन सपना ठाकरे यांनी केले. तसेच रांगोळी सजावट किरण गवळी, भूपेंद्र साळुंखे, दीपमाला अहिरराव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता नेरकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन श्वेता सोनवणे, पुनम पवार व सपना ठाकरे यांनी केले. शाळेचे अध्यक्ष, प्राचार्य, उपप्राचार्य, शाळा समन्वयक, सर्व शिक्षक -शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी,ड्रायव्हर बंधू व मंडप डेकोरेटर, साऊंड सिस्टम मालपूर- कासारे या सर्वांच्या सहकार्याने बाल आनंद मेळाव्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात, आनंदात आणि हर्ष उल्हासात साजरा झाला.