प्रचिती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला शैक्षणिक सहलीचा आनंद
पिंपळनेर : विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण तणाव दूर करण्यासाठी प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर शाळेची सहल’ स्वामीनारायण मंदिर ‘व ‘माय हॉलिडे अम्युजमेंट अँड वॉटर पार्क धुळे येथे काढण्यात आली.
शाळेचे चेअरमन प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीची सफर स्वामीनारायण मंदिर व माय हॉलिडे अम्युजमेंट अँड वॉटर पार्क धुळे येथे केली. शाळेचे समन्वयक राहुल अहिरे, मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी शैक्षणिक सहलीचे नियोजन केले. लहान गट एलकेजी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्वामीनाथन मंदिर व माय हॉलिडे अम्युझमेंट अँड वॉटर पार्क धुळे येथे जाण्याचा आनंद घेतला. शाळेच्या आवारातून दोन्ही बस सकाळी निघाल्या. विद्यार्थ्यांनी गाणी गात प्रवासाचा आनंद घेतला.
सर्व विद्यार्थ्यांना सँडविच चा नाष्टा देण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी हसतमुखाने त्याचा आस्वाद घेतला .त्यानंतर आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी सुरक्षितपणे बस मध्ये बसवले. व आम्ही वाटर पार्क हॉलिडे अमित अँड वॉटर पार्क येथे विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला. थंड पाण्यात संगीतावर नृत्य केल्यानंतर मुलांनी दुपारच्या जेवनाचा आस्वाद घेतला.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली. सायंकाळी परतीच्या मार्गाला जाताना विद्यार्थ्यांना नाश्ता देण्यात आला. शाळेच्या सहलीचे नियोजन अश्विनी पगार यांच्यासह शिक्षकांनी केले. सहलीचे छायाचित्रण रिनल सोनवणे यांनी केले.
शैक्षणिक सहलीला अनन्यसाधारण महत्व असते. कारण ते केवळ आपला दृष्टिकोनच विस्तृत करत नाही. तर आपले ज्ञान देखील मोठ्या प्रमाणात वाढ होते. म्हणूनच सर्व विद्यार्थी या अनमोल क्षणाचे आतुरतेने वाट पाहतात. मनोरंजनार्थ केलेल्या प्रवास सर्वान समवेत सह प्रवासाचा समुदायिक आनंद देणारा व अनुषंगाने सहल स्थळाची प्रत्यक्षदर्शी माहिती व ज्ञान मिळवून देणारा ठरला. हा रंजन प्रकार प्राचीन काळापासून लोकप्रिय ठरत असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद घेतला.