प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे विज्ञान, गणित व समाजशास्त्र विषयक प्रदर्शनाचे आयोजन
साक्री :- प्रचिती इंटरनॅशनल स्कूल,साक्री येथे विज्ञान, गणित व समाजशास्त्र या विषयावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाची सुरुवात सरस्वती माता, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज,भारताचे थोर शास्त्रज्ञ व भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील, प्रमुख पाहूणे विनोद आनंदा सोनवणे (कासारे), विशाल नारायण शिंदे (साक्री), शिवाजी बन्सीलाल पाटील ( स्व.अण्णासाहेब आर.डी.देवरे विज्ञान,कला महाविद्यालय, म्हसदी ), प्राचार्य वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. वक्ते शिवाजी पाटील, विनोद सोनवणे, विशाल शिंदे यांनी थोर शास्त्रज्ञ न्युटन, आईन्सटाईन, एडिसन, जगदिशचंद्र बोस, डाँ.ए.पी.जे.अब्दुल कलाम इत्यादी शास्त्रज्ञाचे शोध व त्यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली.मान्यवरांच्या उपस्थितीत विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सर्व विद्यार्थी व पालकांनी विज्ञान प्रदर्शनाची पाहणी केली. आजचे युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे युग आहे. हे सर्वांना माहीतच आहे. विज्ञानाच्या आविष्कारामुळे आपले जीवन सरळ व सोयीस्कर झाले आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, गणित व समाजशास्त्र विषयाबाबत आवड व रुची निर्माण करणे हे त्यामागचे मुख्य उद्दिष्टये अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी लक्षात घेतले. विज्ञान प्रदर्शनाचे संयोजन करून विज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची तसेच संशोधन वृत्ती वाढीस लागावी, या उद्देशाने विज्ञान प्रदर्शनाचे मुख्य आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाची चालना मिळावी या दृष्टिकोनातून व संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने या विज्ञान गणित व समाजशास्त्रीय विषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी विज्ञान प्रदर्शनामध्ये विज्ञान, गणित व समाजशास्त्र या विषयांचा समावेश करून उद्योग, नैसर्गिक संसाधने आणि त्यांचे संवर्धन वाहतूक व दळणवळण, माहिती व शैक्षणिक तंत्रज्ञान, सामुदायिक आरोग्य आणि पर्यावरण, गणितीय प्रतिकृती असे विविध विषय घेऊन इयत्ता नर्सरी ते इ. १० वीपर्यंतच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी प्रदर्शनीय वस्तूंची मांडणी केली.
“विज्ञानाने केली क्रांती
विज्ञानाने केली प्रगती
विज्ञानाने दिला एक नवा ध्यास विज्ञानाने झाला संपूर्ण देशाचा विकास हा संदेश विज्ञान प्रदर्शनामार्फत सर्व विद्यार्थ्यांना संदेश देण्यात आला. वैज्ञानिक वृत्ती लहानपणापासून संस्कारीत करण्यासाठी आणि मोठेपणी अज्ञानाचा शोध घेण्यासाठी विजीगिषू वृत्ती निर्माण व्हावी म्हणून विद्यार्थी- दशेतच तिची बिजे रोखली गेली पाहिजेत.या उद्देशाने या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन प्रचिती इंटरनॅशनल स्कूल यांच्यावतीने करण्यात आले. या प्रदर्शनाच्या कार्यक्रमात आरोग्य विषयक नाटिका इयत्ता ३ री.ते ४थी च्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सादर केली. या आरोग्य विषयक नाटिकेचे संयोजन – रोहिणी अहिराव यांनी केले. तसेच इयत्ता नर्सरी ते इ.१ ली. पर्यंत विज्ञान व गणित विषयाचे प्रकल्प विद्यार्थी- विद्यार्थिनींकडून प्रकल्प तयार करून घेण्याचे कार्य व संयोजन सविता लाडे मॅडम, नम्रता गोसावी यांनी केले. या संयोजनात विद्यार्थ्यांनी पाळीव प्राणी, जंगली प्राणी,सजीव वस्तू- निर्जीव वस्तू, ऋतू, जलचर- प्राणी,वाहतूक नियंत्रण, सण- उत्सव, राष्ट्रीय बोधचिन्हे, सौर- ऊर्जा, पाण्याचे स्रोत, माझी शाळा इत्यादी विषयांवर आधारित एकूण ४८ प्रकल्प त्यांनी तयार करून प्रदर्शनात सादर केले. तसेच इयत्ता २ री. ते १०वी.पर्यंत विज्ञान,गणित व समाजशास्त्र याविषयी प्रकल्प विद्यार्थी-विद्यार्थ्यांकडून प्रकल्प बनवून घेण्याचे संयोजन विज्ञान विषयाचे शिक्षक श्रावण अहिरे, प्रफुल साळुंखे, गणेश नांद्रे व समाजशास्त्र विषयाचे शिक्षक सपना देवरे, राहुल पाटील, कुणाल पान पाटील आणि गणित विषयाचे शिक्षक धर्मराज अहिरे, स्नेहा साळवे व रुपेश कुवर यांनी संयोजन करून विद्यार्थ्यांकडून प्रकल्प बनवून घेतले. यामध्ये विद्यार्थ्यांनी जलशुद्धीकरण, वाहतूक संकेत, पवनचक्की, ज्वालामुखी उद्रेक,सुंदर शहर, हवा प्रदूषण, गावाचे सुंदर दृश्य, सूर्यमाला, वायू प्रदूषण, पवन चक्की, वातावरणातील स्थर भारताचा पहिला स्वातंत्र्यलढा, धातू व खनिज यांचा उपयोग, ऐतिहासिक स्मारके,लोकशाहीची तत्वे, जलशुद्धीकरण यंत्र, राज्य व राजधान्या,मूलभूत तत्वे, नवीन संसद भवन इत्यादी आकर्षक व वेगवेगळे प्रकल्प विद्यार्थ्यांनी बनवले. यात एकूण ७१ प्रकल्प विद्यार्थ्यांनी बनवून त्यांचे सादरीकरण करून प्रदर्शन भरवले. या प्रदर्शनात इ.८वी-(अ )मधील विद्यार्थिनी अनुष्का बागले, आर्या सोनवणे, भार्गवी ठाकरे यांनी विज्ञानातील “Obstacle finding Arduino nano robot” या प्रकल्पावर आधारित सुंदर प्रदर्शन केले. व कार्यक्रमात स्वागतासाठी इयत्ता ७ वी. मधील विद्यार्थिनींनी उत्तम असे लेझीम नृत्य सादर केले. या लेझीम नृत्याचे संयोजन गीतांजली काकुस्ते यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन सविता लाडे, नम्रता गोसावी,श्रावण अहिरे, प्रफ्फुल साळुंखे,गणेश नांद्रे, सपना देवरे , राहुल पाटील, कुणाल पानपाटील, धर्मराज अहिरे,स्नेहा साळवे,रुपेश कुवर यांनी संयोजन करून या कार्यक्रमाचे उत्कृष्ट प्रदर्शन भरवण्यात आले. विद्यार्थ्यांना विज्ञान-तंत्रज्ञानाची जाणीव करून देऊन त्या विषयाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली. शेवटी विद्यार्थ्यांनी जे विविध प्रकल्प सादर केले. त्यांचे परीक्षण विनोद सोनवणे (कासारे), विशाल शिंदे (साक्री) श्री.शिवाजी पाटील (म्हसदी)यांनी केले.व विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रत्येक्ष भेट देऊन या प्रकल्पांची पाहणी केली व विद्यार्थ्यांमध्ये “एक नवी आशा व नवी दिशा” त्यांना या विज्ञान प्रदर्शनामधून दिली जाते ही आशा त्यांनी बाळगली आणि सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून सर्व पालकांनी कौतुक केले व शेवटी सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य, उपप्राचार्य, शाळा समन्वयक यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला. या कार्यक्रमात रांगोळी व उत्तम सजावट किरण गवळी, दीपमाला अहिरराव,भूपेंद्र साळुंखे यांनी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना देवरे यांनी केले.