दि. २६ नोव्हेंबर: प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात व आदरपूर्वक साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, लोकशाही मूल्यांची जाणीव व्हावी तसेच नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये समजावेत, या उद्देशाने शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आदरणीय प्रशांत पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे इन्चार्ज निखिल सर होते. कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या अनिता पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. प्राचार्या अनिता पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानातील मूलभूत मूल्ये तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीव ठेवण्याचे महत्त्व समजावून सांगितले. शाळेचे समन्वयक राहुल अहिरे सर यांनीही विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे महत्त्व, लोकशाही, समानता, बंधुता व न्याय या मूल्यांविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचा आदर करून एक जबाबदार नागरिक बनण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाची सुरुवात अर्चना मॅडम यांनी विद्यार्थ्यांकडून इंग्रजी भाषेत भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील महत्त्वपूर्ण मूल्यांची माहिती दिली. त्यानंतर किरण मॅडम यांनी विद्यार्थ्यांकडून मराठी भाषेत संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून घेतले. विद्यार्थ्यांनी प्रस्तावनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांचा अर्थ समजून घेतला.
यानंतर सुनीता जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांकडून संविधान दिनानिमित्त घोषवाक्ये सादर करून घेतली. विद्यार्थ्यांनी संविधानाचा आदर, लोकशाहीची जपणूक, समानता आणि राष्ट्रीय एकात्मता यांचा संदेश देणारी घोषवाक्ये उत्साहाने सादर केली. घोषवाक्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व संविधानाबद्दल आदराची भावना निर्माण झाली.
अभिषेक मोरे सर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची निर्मिती, संविधान सभेचे कार्य, संविधान स्वीकारण्याचा ऐतिहासिक दिवस, मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्ये याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले व २६ जानेवारी १९५० रोजी त्याची अंमलबजावणी सुरू झाली, याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील महान योगदानाची ओळख करून देत विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन केले.
यानंतर प्रसाद सर यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांनी या दुर्दैवी घटनेचे गांभीर्य समजावून सांगत देशाची एकता, अखंडता, शांतता आणि सुरक्षितता जपण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना व शूर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना उभे राहून दोन मिनिटे मौन धारण करण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी शांततेत मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाप्रती जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली.
भारतीय संविधान हे आपल्या देशाच्या शासनव्यवस्थेचा पाया असून, ते प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुता या मूल्यांची प्रेरणा देते. संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला अधिकार प्राप्त झाले असून, देशाच्या एकता, अखंडता व प्रगतीसाठी कर्तव्यांचे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत उत्तम सहकार्य केले. प्रत्येक शिक्षकाने आपापली जबाबदारी नियोजनबद्ध व समर्पित भावनेने पार पाडली. कार्यक्रमाच्या तयारीपासून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यापर्यंत सर्व शिक्षकांनी एकजुटीने मेहनत घेतली. शिक्षकांच्या सहकार्याने, एकात्मतेने व उत्कृष्ट नियोजनामुळे संविधान दिनाचा कार्यक्रम अतिशय सुंदर, शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमासाठी ब्लॅकबोर्ड सजावटीचे काम प्रसाद सर यांनी केले. छायाचित्रणाची जबाबदारी मयुरी मॅडम यांनी पार पाडली, तर व्हिडिओ चित्रीकरण प्रेरणा मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची बातमी संकलित करण्याचे काम सायली पवार मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी निखिल सर यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन करणारे माननीय प्रशांत पाटील सर, प्राचार्या अनिता पाटील मॅडम, समन्वयक राहुल अहिरे सर, सर्व शिक्षकवृंद व सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानले.
संविधान दिनाचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी व संस्कारक्षम ठरला. संपूर्ण शाळेत संविधानाबद्दल आदर, जागरूकता, देशभक्ती आणि लोकशाही मूल्यांची भावना निर्माण झाली.






















