कार्यक्रमासाठी चेअरमन श्री प्रशांत भीमराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. पिवळा रंग हा आनंद ऊर्जा उत्साह आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे तसेच तो सूर्यप्रकाश फुले निसर्गातील सुंदरतेची आठवण करून देतो या दिवशी सर्व चिमुकले विद्यार्थी पिवळ्या रंगाच्या पोशाखात आले होते व येताना विविध प्रकारच्या पिवळ्या रंगाच्या वस्तू तयार करून आणल्या होत्या कार्यक्रमात त्यांनी आणलेल्या याच वस्तूंची त्यांना ओळख करून देण्यात आली.
कार्यक्रमांमध्ये Ukg च्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर नृत्याचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या इन्चार्ज शितल शिंपी मॅडम यांच्या निदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या मॅडम यांनी केले प्राचार्य अनिता पाटील मॅडम आणि समन्वयक राहुल अहिरे सर यांनीही विद्यार्थ्यांना रंगाचे महत्त्व समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या मॅडम यांनी केले व तसेच या रंगाविषयी आरती मॅडम यांनी सुंदर माहिती सादर केली.
कार्यक्रमात रंग यावा यासाठी रांगोळी सरिता मॅडम, मयुरी मॅडम यांनी पूर्ण केली. व नृत्य प्रेरणा मॅडम व दिव्या मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली झाले कार्यक्रमाचे बॅनर अर्चना मॅडम, सायली मॅडम ,जागृती मॅडम, किरण मॅडम, प्रसाद सर ,अभिषेक सर ,निखिल सर यांनी ही जबाबदारी पार पाडली. तसेच बोर्ड अश्विनी मॅडम सुनीता मॅडम यांनी सजवला .अशा रीतीने अतिशय सुंदर रीत्या कार्यक्रम पार पडला व कार्यक्रमाच्या शेवटी दिव्या मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

























