पिंपरी चिंचवड – चिंचवडच्या विविध भागातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. मोहननगर, कळभोरनगर, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, रामनगर, महात्मा फुलेनगर, दत्तनगर, शंकरनगर, विद्यानगर, परशुराम, आनंदनगर, इंदिरानगर आदी परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रचंड वावर असून त्यामुळे येथील विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक, कामगार यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
या परिसरात मोकाट कुत्री रात्रीच्या वेळेत खूप जोरजोरात भुकंतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेत नागरिकांची निद्रानाश होतो. लहान मुले घाबरून जागे होतात. हे मोकाट कुत्रे लहान मुले, महिलांच्या अंगावर गुरगुरुन धावतात. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच, या परिसरातील सेकंन्ड, थर्ड शिफ्टला जाणाऱ्या, येणाऱ्या कामगारांच्या वाहनाच्या मागे हे कुत्रे धावतात. प्रसंगी चावा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हे कामावर येणारे जाणारे कामगार आपले वाहन जोरात पळवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे यापुर्वी अनेक लहान-मोठे अपघात झाले आहे. यापुढे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता नाही.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वर्षानुवर्ष पशुवैद्यकीय विभागामार्फत निविदा काढून मोकाट कुत्रे पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याच्या कामाचा ठेका देण्यात आला आहे. महापालिकेने या कामासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत मात्र, कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येण्याऐवजी ती वाढतानाच दिसत आहे. पिंपरी चिंचवड मनपाच्या वायसीएम रुग्णालय तसेच इतर रुग्णालयात श्वानदंशाचे पिडीत व्यक्ती रॅबिज इजेंक्शन घेऊन उपचार घेत आहेत. याची आपण स्वत: लक्ष घालून माहिती मागवावी; म्हणजे या गंभीर प्रकरणाचे गांभीर्य आपल्या लक्षात येईल.
गंभीर प्रकरणात स्वतः लक्ष घालून संबंधित विभागाला याबाबत योग्य उपाययोजना करण्याबाबत सक्त आदेश देऊन आमच्या या विभागातील या गंभीर समस्येचे विनाविलंब निराकारण करावे, अशी मागणी भापकर यांनी केली आहे. तसेच जर एखादा मोठा अपघात होऊन एखाद्या नागरिकाला प्राणास मुकावे लागले, तर याची सर्वस्वी जबाबदारी आयुक्तांची असेल, असे त्यांनी म्हंटले आहे.६ ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांपैकी केवळ निम्मे विद्यार्थी गणित शिकतात. या आकडेवारीमध्ये विज्ञान पाठ्यक्रम आणि जीसीएसई अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.