पिंपरी – न्यूज पेपर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना ‘बेस्ट एमएलए’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री पी. पी. चौधरी उपस्थित होते.
न्यूजपेपर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्ली येथील ‘एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटर’ मध्ये या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी देशभरातील कला आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
सर्वाधिक क्रियाशील आमदार म्हणून महेश लांडगे यांच्या नावाची निवड करताना, आम्हाला अभिमान वाटतो, असे मत संघटनेचे मुख्य सचिव विपीन गुप्ता यांनी व्यक्त केले.
न्यूजपेपर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. ‘बेस्ट एमएलए’ हा सन्मान मिळविणारे आमदार लांडगे देशातील एकमेव आहेत.