शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगीरीबददल खान्देश मराठा पाटील समाज संघातर्फे पुरस्काराचे वितरण
पिंपरी:- खान्देशातील धुळे सारख्या ग्रामीण आदीवासीबहुल भागात शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगीरी केल्याबददल प्रचिती पब्लिसीटीचे संचालक प्रशांत पाटील यांना खान्देश मराठा पाटील समाज संघातर्फे “शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार” देवून गौरविण्यात आले. आकुर्डी येथे चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश चव्हाण, पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त प्रतिभा पाटील, खान्देश फेम विनोद कुमावत, राणी कुमावत यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, मा.नगरसेवक राहूल कलाटे, मोरेश्वर भोंडवे, उद्योजक दीपक पाटील, मंडळाचे अध्यक्ष महेंद्र पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव शंकर पाटील, मंडळाचे कार्यध्यक्ष उद्योजक शरद पाटील, सहकार्याध्यक्ष पंकज निकम, संचालक मोतीलाल भामरे, प्रदीप शिरसाठ, देविदास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. प्रशांत पाटील हे गेल्या १५ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. धुळे जिल्हयातील साक्री येथे प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, प्रचिती प्री प्रायमरी, प्रचिती ज्युनिअर कॉलेज तसेच पिंपळनेर येथे प्रचिती पब्लीक स्कूलची स्थापना केली असून अनाथ मुलांना मोफत शिक्षण, कोरोना काळात विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत शिक्षण यासारख्या अनेक योजना राबवित आहेत. तसेच, दरवर्षी दसरा, दिवाळीनिमीत्त आदिवासी पाडयांवर सामाजिक भावनेतून विविध उपक्रम राबवितात, अशी माहिती प्रास्ताविकात अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी दिली. सुत्रसंचालन भरत बारी तर आभार शंकर पाटील यांनी मानले.