साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष तथा खानदेश भूषण प्रशांत पाटील यांचा वाढदिवस आदिवासी वस्तीमधील लोकांसोबत वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत आदिवासी वस्तीतील लोकांचा आनंद द्विगुणित व्हावा, यासाठी प्रचिती इंटरनॅशनल स्कूल आणि जुनियर कॉलेजतर्फे कर्मवीर नगर येथील आदिवासी वस्ती, साक्री येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना कपडे, फळे व फराळाचे वाटप करण्यात आले.
शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे यांच्यासह शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग यांच्याहस्ते कपडे, फळे व फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका स्मिता नेरकर यांनी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांना खानदेश मराठा पाटील समाजाच्या वतीने शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, खानदेश रत्न पुरस्कार मिळाला आहे. तसेच, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते धुळे जिल्ह्यातील उत्कृष्ट शाळा पुरस्कार देवून गौरविण्यात आलेले आहे. साक्रीच्या शिक्षण क्षेत्राला आधुनिक बनविणारे ज्ञान महर्षी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच आदिवासी वस्तीवरील लोकांना श्री. प्रशांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.