साक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी, नर्सरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, मकरासन, बद्ध पद्मासन, योगमुद्रा, मत्स्यासन, टोलांगुलासन, उच्छाय शवासन, गोमुखासन, हंसासन, सरवंगासन, सरवंगासन, मकरासन आदी योगासने सादर केली. तसेच, झुंबा डान्स सादर करून आनंद व्यक्त केला. इयत्ता नववीची विद्यार्थिनी खुशी पंजाबी, अनुश्री पाटील हिने प्रास्ताविक केले.
शिक्षिका मनिषा बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेने जगभरात २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. “निरोगी शरीरात निरोगी आत्मा” राहणे शक्य आहे. “शरीर निरोगी नसेल तर जगातील सर्व वैभव आणि चवही सुख देत नाही. शरीर निरोगी होण्यासाठी व्यायाम व योगासने करणे आवश्यक आहे. व्यायामाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीराला विस्तार होतो. आपले स्नायू मजबूत होतात. रक्तप्रवाह जलद होवून पचनशक्ती जलद होवून नसांचा व्यायाम वाढतो. त्वचा स्वच्छ होवून शरीर निरोगी राहते. नियमित योगासने, व्यायामाने आपला मानसिक व आध्यात्मिक विकास वाढतो. प्रत्येक विद्यार्थ्याने सकाळी लवकर उठून अर्धा तास योगासने किंवा व्यायाम केल्यास कुठलाही आजार उदभवणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली लाडे म्हणाल्या की, आजच्या व्यस्त जीवनात लोकांना वेळ मिळत नाही. किमान एक किलोमीटर तरी चालावे. दोन्ही हातांनी टाळ्या वाजवून रक्तशुद्धी होईल. रोज दीर्घ श्वास घ्या आणि हळू हळू श्वास सोडा. तुम्हाला कधीच दमा होणार नाही आणि फुफ्फुसे ठीक होतील.
योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञानावर आधारित स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये पृथ्वी, बुध, युरेनस, मंगळ, गुरु, शुक्र नावाचा संघ तयार करण्यात आला. पाच फे-यांमध्ये झालेल्या स्पर्धेत बुध संघाचे विद्यार्थी विजयी झाले. परीक्षक म्हणून तुषार सूर्यवंशी यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावण सरणे यांनी केले. यासाठी फलक देखील लावण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली लाडे, उपप्राचार्या मालविका चक्रवती, प्रशासक तुषार देवरे, वैभव सोनवणे, तसेच शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.