साक्री : धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या जिल्हास्तरीय ज्यूडो क्रीडा स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी विभागस्तरावर मजल मारली. जिल्हास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेत १ सप्टेंबर २०२३ रोजी धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे १४ वर्षे, १७ वर्ष व १९ वर्ष मुले- मुली वयोगटातील ज्यूडो क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये, १४ वर्षे व १७ वर्ष मुले/मुली वयोगटात प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या आर्या सोनवणे (१४ वर्ष), भावेश बोरसे (१४ वर्ष), सिद्धी पोपली (१७ वर्ष ), सायना शाह(१७ वर्ष), रुचिरा खैरनार (१७ वर्ष ), करण सूर्यवंशी(१७ वर्ष) यांनी जिल्हास्तरावर सर्वोत्तम कामगिरी करत विभागस्तरावर मजल मारली.
१४ वर्षे वयोगट आणि १७ वर्ष वयोगटामधून जिल्ह्यातून हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा तालुका शिंदखेडा, चावरा पब्लिक स्कूल ता. धुळे येथील संघानी सहभाग नोंदवला होता. जिल्हास्तरीय क्रीडा अधिकाऱ्यांनी १४ वर्ष, १७ वर्ष आणि १९ वर्ष वयोगटाच्या वजनानुसार सामन्यांचे नियोजन केले. प्रत्येक सामना अतिशय पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात आले. या सामन्यात वयोगटातील वजनानुसार तीन ग्रुपमध्ये सामने घेण्यात आले. विजयी विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील विभागस्तरीय लेदर ज्यूडो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. संघास शाळेचे व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे तसेच ज्यूडो मार्गदर्शक संजय जमदाडे, क्रीडा शिक्षक कुणाल देवरे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.