पिंपळनेर : येथील प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये सोमवारी विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी, विद्यार्थ्यांनी विविध अविष्कारांची माहिती जाणून घेत विज्ञानाचे धडे घेतले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील होते. सेयान इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक रुपेश भधान, शाळेचे समन्वयक राहूल पाटील, मुख्याध्यापिका अनिता पाटील यांच्यासह विद्यार्थी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व वैज्ञानिक डॉ. सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पणाने झाली. प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाल, श्रीफळ देवून करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी विज्ञानाविषयी माहिती देवून विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाचे महत्व विषद केले. समन्वयक राहुल पाटील, मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी देखील माहिती दिली. यावेळी, विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेल्या विज्ञानाच्या विविध प्रकल्पांचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांची माहिती विषद करताना आजच्या ज्वलंत विषयांवर सर्वांचे लक्ष केंद्रीत करीत भविष्यात हे प्रकल्प कसे उपयुक्त ठरतील, याबाबत पटवून सांगितले. पालकांनी देखील विज्ञान प्रदर्शनाला हजेरी लागली. या कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रकल्प निर्मितीमध्ये
इयत्ता १ लीच्या गुरुराज बिरारी याने पाण्यांचे स्त्रोत, क्रीष्णा सोनवणे – पाळीव प्राणी व जंगली प्राणी, रुद्र जगताप – वाहतुकीचे प्रकार, अनय पवार – सुरक्षिततेचे नियम.
इयत्ता दुसरीचे विद्यार्थी यामध्ये, स्वरा घरटे – पवनचक्की, अनवी पाटील, उत्कर्ष झाल्टे – वनस्पतीचे अवयव व त्याचे उपयोग, दिपराज निकम – सौर ऊर्जा, ज्ञानेश्वरी देसाई – पंचइंद्रिये, सृष्टी भदाणे – पवन ऊर्जा, वैभवी पाटील – पाण्याचे स्त्रोत व त्याचे उपयोग.
इयत्ता ३ रीचे विद्यार्थी – सुयश कोळी – श्वसन संस्था, र्निवैध पाटील – ज्वालामुखी, स्वरुपा बोरसे – लॅपटॉप, सिया हसांनी – एटीएम, सर्वेश खैरनार – जलशुध्दीकरण यंत्र, सार्थक भामरे – श्वसन संस्था, माहेश्वरी सोनवणे – कॉईन बँक, श्रेयस शेवाळे – जलचक्र.
इयत्ता ४ र्थीचे विद्यार्थी – परी घरटे – हरितक्रांती व जागतिक तापमान वाढ, अवनी पवार, हार्दिक कुवर – जलशुध्दीकरण, अंकिता अहिरे – अतिवृष्टी.
इयत्ता ५ वीचे विद्यार्थी – देव्यानी शेवाळे –पृथ्वी वाचवा, सिध्दार्थ शिंदे – वनीकरण आणि जंगलतोड, निलेश शेवाळे – वनीकरण आणि जंगलतोड, लावण्या अहिरे – प्रदुषणाचे प्रकार, चैताली भदाणे – ज्वालामुखी, पर्व खैरनार – चंद्रयान, दंश संदानसी – ज्वालामुखी, पुष्कर पाटील – पवन ऊर्जा.
इयत्ता ६ वीचे विद्यार्थी – चैतन्य बच्छाव – जल शुध्दीकरण यंत्र, स्वयम भदाणे – सूर्यग्रहण, वैष्णवी भामरे – वातावरणाचा थर, आयुष देसले – प्रकाश संश्लेषण, नैतिक सोनवणे – ज्वालामुखी, प्रांजल सूर्यवंशी – चंद्रयान ३.
इयत्ता ७ वीचे विद्यार्थी – हेतल सोनवणे, अक्षदा कापडनिस – सूर्यमाला, हर्षदा शेवाळे – सौर पॅनेलसह पवनचक्की, श्रावणी शेवाळे – सौर ऊर्जावर शेती, अवनी कापडनिस – चंद्रयान, ऋषिकेश जाधव, अर्णव बिरारीस – वीजेवर चालणारी गाडी, तेजस खैरनार, प्रणव सोनवणे – अणुऊर्जा प्रकल्प.