पिंपरी :- चिंचवड विधानसभा मतदार संघाचे सर्वपक्षीय पाठिंबा असलेले उमेदवार राहुल कलाटे यांनी आज सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या मातोश्री माजी नगरसेविका कमल कलाटे तसेच पत्नी वृषाली कलाटे यांनी मतदान केले.
चिंचवड विधानसभेत महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप विरुद्ध राहुल कलाटे यांच्यात थेट लढत होत आहे. कलाटे यांना सर्वच विरोधी पक्षाने पाठिंबा दिल्यामुळे या लढतीत त्यांचे पारडे जड झाले आहे. आता मतदार नेमका कोणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान लोकांना परिवर्तन हवयं, गेल्या दोन आठवड्यांच्या प्रचारादरम्यान मतदारांचा उस्फुर्त मिळत असलेला प्रतिसाद त्यामुळे चिंचवडमध्ये यावेळेस नक्कीच बदल घडेल असा विश्वास राहुल कलाटे यांनी व्यक्त केला.