पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघात आज (सोमवारी) सकाळी सात पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सुदैवाने दिवसभरात पाऊस देखील झाला नाही. मात्र मतदानाच्या टक्केवारीत अपेक्षित वाढ झाली नाही. सायंकाळी पाच वाजेपर्यंत पिंपरी मतदारसंघात 42.67 टक्के एवढे मतदान झाले आहे. चिंचवड विधानसभेत 51.33 टक्के मतदान झाले. तर भोसरीत विधानसभेत 50.25 टक्के एवढे मतदान झाले आहे.
सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेले मतदान
चिंचवड – 51.33
पिंपरी – 42.67
भोसरी – 50.25
दुपारी 3 पर्यंत झालेले मतदान
चिंचवड – 35.79
पिंपरी – 31.28
भोसरी – 40.35
दुपारी 1 पर्यंत झालेले मतदान
पिंपरी – 21.64 टक्के
चिंचवड – 34.41% टक्के
भोसरी – 26.52% टक्के
सकाळी 11 पर्यंत झालेले मतदान
पिंपरी – 11. 70 टक्के
चिंचवड – 16.37 टक्के
भोसरी – 13.83 टक्के
सकाळी 9 पर्यंत झालेले मतदान
पिंपरी – 4.01 टक्के
चिंचवड – 6.10 टक्के
भोसरी – 5.11 टक्के