पिंपळे निलख – नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 15 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याची घटना पिंपळे निलख येथे घडली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती गोवर्धन कल्लुरकर (वय 30), सासरे श्रीधर कल्लुरकर (वय 58), सासू सरिता कल्लुरकर (वय 53), दीर हर्षल कल्लुरकर (वय 21, सर्व रा. नवयुग चौक, पिंपळे निलख) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 27 वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सप्टेंबर 2018 ते 18 नोव्हेंबर 2019 या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली. नवीन फ्लॅट घेण्यासाठी फिर्यादी विवाहिता यांनी माहेराहून 15 लाख रुपये आणण्याची मागणी आरोपींनी केली. ते न आणल्यामुळे तसेच कौटूंबिक कारणावरून आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना शाररीक व मानसिक छळ केला. लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकीही दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.