चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये 4 फेब्रुवारी 2023 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी शाळेचे संस्थापक श्री.प्रशांत भीमराव पाटील सर,सौ. कविता प्रशांत पाटील शाळेच्या प्राचार्या सौ.भारती पंजाबी मॅम, सौ. वैशाली लाडे मॅम, व्यवस्थापक श्री. तुषार देवरे सर, श्री. वैभव सोनवणे सर, श्री. राहुल अहिरे सर,प्रमुख अतिथी सौ.ज्योती सूर्यवंशी मॅम (साक्री ) सौ. योगिता ठाकरे मॅम (धाडणे )सौ. पूजा बोरसे मॅम (कावठे )सौ.दिपाली जाधव (साक्री )डॉक्टर खुशबू देवरे मॅम (साक्री )सौ. चंदानी पंजाबी मॅम (साक्री )सौ. स्वाती देसले मॅम (सायने )सौ. रेणुका साळुंके मॅम (शेवाळी )सौ. कविता देशमुख मॅम( साक्री) दीपिका वानखेडे मॅम( साक्री) सौ. अर्चना सोनवणे मॅम( भाडणे) यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता व नृत्याचे देवता नटराज यांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख अतिथींचा सत्कार शाल, श्रीफळ व फुलांचा गुच्छ देऊन करण्यात आला. याप्रसंगी सौ.दिपाली उमेश जाधव मॅडम प्रचिती इंटरनॅशनल स्कूल विषयी मनोगत व्यक्त करताना सांगितले की या शाळेत नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. यातून विद्यार्थ्यांचा शारीरिक बौद्धिक मानसिक विकास घडविला जातो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्राधान्य दिले जाते. वेगवेगळे सण जयंती साजरी करून विद्यार्थ्यांना मंचावर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. वेगवेगळ्या खेळातून चांगले खेळाडू निर्माण होत आहेत.प्रचितीची अशीच प्रगती होत राहो असे मनोगत व्यक्त केले.या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नर्सरी ते तिसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमा साठी बालपण आणि संस्कार यावर आधारित श्री गणेशा चे गाणे एकदंताय गणनायक जय जय करा (इयत्ता पहिली)सरस्वती वंदना व आईगिरी नंदिनी वेलकम सॉंग (युकेजी व तिसरी )काला चश्मा रिमिक्स (इयत्ता दुसरी ) लावणी (एल के जी) रफ्ता रफ्ता (इयत्ता तिसरी )गोविंदा रीमिक्स (इयत्ता तिसरी )भूरूम भूरूम (नर्सरी )संस्कार थीम वर आधारित येतो सच है की भगवान है पापा कहते है (युकेजी )चंद्रा रिमिक्स (इयत्ता पहिली) फुल थीम वर आधारित सुनो घंटी बजाव रट्टा मार( नर्सरी) गरबा गर्भावर आधारित उडी उडी जाय शुभारंभ (इयत्ता दुसरी )हर हर शंभो शंकरा इयत्ता (एलकेजी )आई वर आधारित मेरी माँ के बराबर कोई नही (इयत्ता दुसरी )मराठी रिमिक्स इयत्ता (युकेजी )सेव वॉटर वर आधारित काले मेघा (एलकेजी) वंदे मातरम मिक्स चक दे इंडिया (इयत्ता तिसरी )भुलभुलय्या सॉंग नाचू नाचू (इयत्तापहिली जोकर थीम जिना यहाँ मरना यहाँ (एलकेजी ) राजस्थानी सॉन्ग इयत्ता तिसरी टुकूर टुकूर( एल के जी) सलमान खान ओ ओ जाने जाना (युकेजी )योगा सॉंग ऑल स्टुडंट्स भुलभुलय्या सॉंग (इयत्ता 10वी) आर्मी सॉंग तेरी मिट्टी (इयत्ता पहिली) फनी डान्स लुंगी डान्स (इयत्ता दुसरी )मेरा जूता है जपानी (इयत्ता तिसरी )अमिताभ बच्चन स्पेशल सारा जमाना मै हु डॉन (इयत्ता दुसरी) नृत्याचे प्रदर्शन केले. या नृत्यासाठी सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी वर्षभर शाळेत होणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा (पीपीटी प्रेझेंटेशन )श्री. मनोज वाघ सर व कोमल मॅम यांनी केले. या कार्यक्रमासाठी सुंदर फलक लेखन व रांगोळी रेखाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन सौ. श्वेता सोनवणे व सौ. पूनम पवार मॅम यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नीतू पंजाबी मॅम व श्री.देवेंद्र रामोळे सर यांनी केले.