Chaupher News
मुंबई : उत्तर प्रदेश आणि हरियाणापाठोपाठ आता महाराष्ट्रातही ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करण्यात आला आहे. ‘तान्हाजी’ करमुक्त करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला. चित्रपट प्रदर्शन झाल्यानंतर तेराव्या दिवशी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नरवीर तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगणारा ‘तान्हाजी’ हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.तानाजी मालुसरेंची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगणसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कालच ‘तान्हाजी’ पाहणार होते. मात्र त्यांनी मंत्रिमंडळासोबत हा सिनेमा पाहणार असल्याचं स्पष्ट केलं.,हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावा याबाबत देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन दिलं होत.