Chaupher News
प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपळनेर येथील प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये प्रमुख पाहुणे विजयकुमार राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण व भारत मातेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थांनी परेड संचालन करून मानवंदना दिली. यावेळी शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, समन्वयक राहुल अहिरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार राहुल अहिरे यांनी केला. त्यानंतर विद्यार्थांनी स्वातंत्र्यसंग्राम, क्रांतिकारक व संविधानावर आधारित भाषणे केली. प्राचार्या वैशाली लाडे, अश्विनी पगार, राहुल पाटील यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात भारत मातेची भूमिका हिमानी सूर्यवंशी हिने साकारली. तसेच आकर्षक रांगोळी व फलक लेखनही करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना देसले यांनी केले. तर आभार कमल पवार यांनी मानले. कार्य्रमासाठी समन्वयक अनिता पाटील, पूजा नेरकर, पल्लवी मोरे, ज्योती खैरनार, अस्मिता बेर्डे, अश्विनी मोरे, शामल बच्छाव यांचे सहकार्य लाभले.