साक्री : तालुक्यातील चिंचखेडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रतिभा नानासाहेब बेडसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
चिंचखेडेसरपंचपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने नवीन सरपंच निवडीसाठी विशेष सभा बोलविण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी आर.जी. सोनवणे, तलाठी विजय बावा
उपस्थित होते.
सरपंचपदासाठी प्रतिभा बेडसे यांचे एकच नामांकन पत्र दाखल झाल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली. ग्रामपंचायतस्थापनेपासून पहिल्या महिला सरपंच होण्याचा मान बेडसे यांना मिळाला. या माध्यमातून नागरिकांना सार्वजनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर प्रर्यंकेले जातील. सार्वजनिक स्वच्छता, बेटी बचाव-बेटी पढाव व वृक्षारोपणाला प्राधान्य दिले जाणार असून व्यसनमुक्तीसाठी विशेष प्रर्यंराहतील, अशी प्रतिक्रिया सरपंच प्रतिभा बेडसे यांनी व्यक्त केली.
सभेला माजी सरपंच अनिल बेडसे, अशोक काकुस्ते, सुपडू वेंदे, तुकाराम वाघ, बन्साबाई माळचे, सरला माळचे, प्रा.नामदेव बेडसे, भटूसिंग गिरासे, महिपत पाटील, महारु पाटील, केदार पाटील, नितीन बेडसे, दादाजी पाटील, हेमंत बेडसे,भिकाजी वाघ,वाजीराव बेडसे,रावसाहेब काकुस्ते, भालेराव बेडसे, रोहिदास बेडसे, जगदीश बेडसे, प्रदीप बेडसे यांचे सहकार्य लाभले. प्रतिभा बेडसे या शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, म्हसदीचे माजी प्राचार्य बी.बी. बेडसे यांच्या स्नुषा तर माध्यमिक शिक्षक एन. बी. बेडसे यांच्या पत्नी आहेत. या निवडीबद्दल बाळासाहेब देवरे, जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते, आर. डी. एस. अहिरे, एस. आर. सोनवणे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
चिंचखेडे सरपंचपदी प्रतिभा बेडसे
