Chaupher News
पुणे : भाजपाचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती बुधवारी रात्री बिघडली असून पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलं आहे.
आमदार शिवेंद्रराजे भोसले हे बुधवारी त्यांच्या ‘सुरुची’ बंगल्यावर होते. यावेळी त्यांना रात्री उशिरा अचानक रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. त्यांना कुटुंबियांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. शिवेंद्रराजे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी वेदांतिका राजेदेखील रुग्णलायात असल्याची माहिती आहे.
आमदार शिवेंद्रराजे यांना सुरूवातीला साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती ठीक असून त्यांना चांगलं वाटल्यास घरी सोडणार असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले असल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.