साक्री- महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता १२ वी (एचएससी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ‘विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवित भरघोस यश संपादित केले आहे. तसेच दूग्धर्शकरा योग म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यातही विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवित शाळेचे नाव यशोशिखरावर नेऊन ठेवले आहेत.
यामध्ये प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्यू. कॉलेज च्या इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक यश नगराळे ह्याने तर जयश्री सोनवणे व्दितीय क्रमांकाने तर तृतीय क्रमांकाने प्रेम जाधव हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रचिती इंटरनॅशनल स्कुल व ज्यु. कॉलेजने यशाची परंपरा जपत सलग दुसऱ्या वर्षी १00 टक्के गुण संपादन करून नवीन यशाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला आहे.
प्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ. भारती पंजाबी यांनी यशस्वीतांचे शब्दसुमनांनी कौतुक केले. त्या म्हणाल्या की १० वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांनी प्रचीतीची अभ्यासाची सुत्री समजावून घेत अथक परीश्रमाने हे यश संपादित केले आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. प्रचितीचे सर्व शिक्षक यासाठी अथक परिश्रीम घेत असतात. या यशस्वीतांचे खरे यशाचे शिलेदार हे माझे शिक्षक आहे असे संबोधले.
या यशस्वीतांचे शाळेचे अध्यक्ष तथा मार्गदर्क मा. प्रशांत भिमराव पाटील तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. भारती पंजाबी, शाळेचे व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे, पिंपळनेर येथील प्रचिती पब्लीक स्कुलचे व्यवस्थसापक राहुल अहिरे आणि शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी भरभरून कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
” प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अॅण्ड ज्यनिअर कॉलेज सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व कर्मचारी वर्ग हा अथक परिश्रम घेत असतात. शाळेत विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकी ज्ञान न देता व्यावहारीक ज्ञानही दिले जाते. इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी करीअर मार्गदर्शन दिले जाते. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा शोध घेत त्यांना आवडीच्या क्षेत्राबद्दल पुरेपुर मार्गदर्शक प्रचितीचे सर्व शिक्षक करीत असतात. कोठलेही दडपण न घेता विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. कुठल्याही खाजगी कोचिंग क्लासेसची मदत न घेता शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले आहे. यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना खुप शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
श्री. प्रशांत भिमराव पाटील
चेअरमन