चौफेर न्यूज – पुण्यात महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना विद्यादान मिळणार आहे. या ठिकाणी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रशिक्षण मिळणार आहे. १ डिसेंबरपासून हे प्रशिक्षण सुरु होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.
सध्या कोविड-१९ची परिस्थिती बघता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. उद्या न्यायालयात तारीख असल्याने आज मी त्या विभागाचा प्रमुख असल्याने बोलणे उचित नाही. जो विचार पूर्वी केला होता, तोच विचार आता करतोय. कोविड-१९ची परिस्थिती बघता परीक्षा घेता येणार नाही आणि हेच प्रतिज्ञापत्र आम्ही न्यायालयात दिले आहे.
CET बाबत अभियान सुरु आहे, सीईटीबाबत सात ते आठ दिवसांत निर्णय होईलस असे सांगून उदय सामंत म्हणाले, तालुका स्तरावर सीईटी घेता येईल का, त्याची चाचपणी करण्यात येत आहे. सीईटी ही स्वायत्त संस्था आहे, त्यांना वैयक्तिक अधिकार आहे. आणीबाणीची परीक्षा बघून बारावीसाठी सीईटी रद्द करण्याचा विचार करत आहेत. याबाबत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी सांगितले.