चौफेर न्यूज – आज दि. 28/08/2020 रोजी वार शुक्रवार शाळेच्या गणपतीच्या सातव्या दिवशी गणपती विसर्जन यानिमित्तने शाळेत आज सत्यनारायण व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सत्यनारायण पुजेचा मान शाळेचे व्यवस्थापक श्री. राहूल पाटील सर व सौ. भारती पाटील मॅडम यांना देण्यात आला.
गेल्या सात दिवसापासून गणपती बाप्पामुळे शाळेत प्रसन्न वातावरण होते. गणपती बाप्पाची आरती सकाळी व सायंकाळी शाळेतील शिक्षक व शिक्षीका यांच्या हस्ते करण्यात आली
”वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ”
”निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा”
हा श्लोक म्हणून शाळेचे चेअरमन श्री. प्रशांत भिमराव पाटील साहेब व प्रचिती पब्लिक स्कुल पिंपळनेर यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी व विघ्नहर्त्यांस प्रार्थना करून विघ्न जाऊ दे व सुख येऊ दे असे गणपती बाप्पाला हात जोडून सांगण्यात आले. अशाप्रकारे शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत गेल्या सात दिवसापासून गणपती स्थापनेपासून ते विसजनापर्यंत कार्यक्रम आनंदाने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे विद्यार्थ्यांची उविण शाळेला भासवली तरी विद्यार्थ्यांनी शाळेत लवकर यावे अशी गणेशाकडे प्रार्थना करण्यात आली. अशाप्रकारे कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.
लायती व्याजपासून विसर्जनापर्यन कायम आनंदाने साजर। करण्यात आला. कारानाच्या प्राकृतिळ विक्ष्याची ऊनिक शळिला भावली तरी विधायीनी शळिन लवकर याव अशी निशाको प्रार्थना करण्यात आली. अशाप्रकारे कार्यक्रमाची सो) झाली महाप्रसादाने झाली.