चौफेर न्यूज – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरूमाऊली यांचे आशीर्वाद व बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग प्रमुख आदरणीय श्री नितीनभाऊ यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने 1 कोटीपेक्षा जास्त सांख्येत श्री गणपती अथर्वशीर्ष पठण यशस्वीपणे संपन्न झाले.
दिनांक 22.08.2020 ते 01.09.2020 या कालावधीत रोज सकाळी 9 वाजता व संध्याकाळी 7 वाजता Shree Gurupeeth या YouTube चॅनेल च्या माध्यमातून श्री गणपती अथर्वशीर्ष पठण घरच्या घरी करण्यात आले. या सेवा मार्गाचा बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग गेल्या 7 दशकांपासून राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अविरत कार्यरत आहे. या विभागाच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थी व युवक यांच्या सहभागातून विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात.
या विभागाचे समाजातील अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, गुन्हेगारी बेरोजगारी अशा विविध सामाजिक अनिष्ट चालीरीती, अंधश्रध्दा, व्यसनाधीनता, गुन्हेगारी, बेरोजगारी अशा विविध सामाजिक प्रश्नांवर उपक्रमांच्या जनजागृती करण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे
सध्या कोरोना महामारीच्या संकटाने आजूबाजूचे वातावरण गंभीर व भीतीदायक होऊन मुले व पालकांमध्ये याचा नकारात्मक परिणाम झालेला दिसून येतो आहे
या अथर्वशीर्ष पठणाने या कोरोना संकटात सर्वांच्या अंगी मानसिक शांतता, धैर्य व सकारात्मक विचारसरणी निर्माण होऊन हे संकट लवकरात लवकर दून व्हावे अशी प्रार्थना विघ्नहर्त्या बाप्पाला करण्यात आली.
सदर श्री गणपती अथर्वशीर्ष पठणामध्ये राज्य-परराज्य आणि परदेशातून देखील भाविकांनी सहभाग उस्फुर्तपणे सहभाग घेतला.