चौफेर न्यूज – राज्यातील सीईटी परीक्षा पुढे ढकलल्या, अंतिम वर्षाच्या परीक्षेदरम्यान सीईटी परीक्षा येत असल्याने आता या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीईटी सेलच्या वतीने ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा आणि विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा एकाच वेळी होत असल्याने त्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी करण्यात येत होती. आता या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या आहेत. आता या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात न होता, तारखांमध्ये पुन्हा बदल केल्याचे परिपत्रक सीईटी सेलने जारी केले आहे.

सुधारित सीईटी वेळापत्रकएलएलबी (पाच वर्षे) – ११ ऑक्टोबर, एलएलबी (तीन वर्षे) – २ आणि ३ नोव्हेंबर, बीए/ बीएस्सी, बीएड इंटिग्रेटेड – १८ ऑक्टोबर, बीएड/एमएड सीईटी – २७ ऑक्टोबर, एमपीएड सीईटी – २९ ऑक्टोबर, बीपीएड – ४ नोव्हेंबर, फिल्ड टेस्ट ५ ते ८ नोव्हेंबर, एमएड – ५ नोव्हेंबर, एम-आर्च सीईटी – २७ ऑक्टोबर, एम- एचएमसीटी – २७ ऑक्टोबर, एमसीए – १० ऑक्टोबर — २८ ऑक्टोबर, बी-एचएमसीटी – १० ऑक्टोबर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here